Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध मद्यविक्री व वाहतुकीवर कारवाई केली. १६ मार्च ते ३ मे २०२४ या काळात ६० हजार लिटरहून अधिक व जप्त केलेल्या मद्यसाठ्याची किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. (Nashik Crime Liquor stock worth over one and half crore seized by Excise)
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी मोहीम राबविण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आतापर्यंत ३९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात प्रथमच कारवाई होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा कार्यक्षेत्रात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. यात नाशिक, दिंडोरी व धुळे जिल्ह्यातील बागलाण व मालेगाव असा परिसर समाविष्ट आहे. जप्त करण्यात आलेला सर्वाधिक मद्यसाठा नाशिक लोकसभा मतदारसंघातील आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान व निकाल पूर्ण होईपर्यंत ७६ हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले होते. मागील लोकसभे दरम्यान झालेल्या कारवाईची तुलना केली असता जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किमतीमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
निवडणूक जप्त मद्य (लि) किंमत गुन्हे दाखल
२०१९ ७६०५७ ९३,९८,६३१ ४३०
२०२४ ६११७१ १,५७,६६,७९२ ३९५
----------------------------------------
"निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गस्त व गुप्त माहितीच्या आधारे कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योग्य समन्वयातून कारवाई होत आहे. अजूनही निवडणुकीला दोन आठवडे बाकी आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीतही अशाच प्रकारे कारवाया सुरू राहतील." - शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.