Nashik Crime News : राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या वतीने अवैध व विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्यसाठा वाहतूक व बाळगणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात अनेक कारवाया केल्यामुळे जवळपास साडेसात कोटींचा अवैध मद्यसाठा व वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेला मद्यसाठा व वाहने इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, की राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागासुद्धा अपुरी पडत आहे. (Nashik Crime Liquor stock worth seven and a half crore seized in a year Action by State Excise Department)
२०२२-२३ मध्ये दोन हजार ३१७ गुन्हे दाखल करण्यात आले होते व त्यामध्ये एक हजार ६६५ अटक आरोपी होते. त्या कालावधीत पाच कोटी ७२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. २०२३-२४ मध्ये मार्चमध्ये दोन हजार ४७६ गुन्हे दाखल होऊन अटक आरोपींची संख्या दोन हजार ३७० आहे व सात कोटी ५२ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहने जप्त करण्यात आली आहे.
परराज्यातून प्रामुख्याने दीव, दमन, गोवा व पंजाब या राज्यांतून विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्यसाठा विक्रीसाठी येत असे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाढविलेली गस्त, खबऱ्यांचे नेटवर्क व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेली कारवाई यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षभरात मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे.
रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य मिसळणे, यावरही कारवाई करण्यात आल्याने अवैध दारूविक्री व वाहतुकीस मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे.
"गेल्या वर्षभरात अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य समन्वय, गुप्त माहिती, खबऱ्यांचे नेटवर्क, वेगवेगळ्या फिल्डवर काम करणारे कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेल्या कामाचे प्रोत्साहन देऊन हे शक्य झाले आहे. यापुढेही आयुर्वेद मद्यसाठा वाहतूक व बनावट मद्य विक्री याविरुद्ध कारवाया सुरूच राहातील. नागरिकांनाही कुठे मद्यसाठ, विक्री अथवा वाहतूक करताना आढळल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा."- शशिकांत गर्जे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.