नाशिक : शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांचा ऐवज चोरणारी टोळी सक्रिय असताना, रिक्षा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांचीही सुरक्षितता राहिलेली नाही. दोघी ज्येष्ठ महिलांना रिक्षा प्रवासात आपला ऐवज गमवावा लागला आहे. सहप्रवासी असलेल्यांनी दोन्ही घटनेत तब्बल ३ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. रविवार कारंजा ते पंचवटी कारंजा या दरम्यान रिक्षात प्रवास करताना जेष्ठ महिलेच्या हातातील पिशवी कापून त्यातील सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केली. (lost 3 lakhs in rickshaw journey incident on highway )