Nashik Crime : वन विभागाच्या हाती लागेना खैर तस्करीतील मुख्य संशयित; 3 महिने उलटूनही प्रकरणाचा तपास रखडलेला

Latest Crime News : तीन महिने उलटूनही या प्रकरणातील खैर तस्करीचा मुख्य सूत्रधार तथाकथित शेठ अजूनही वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकरणाचा तपास रखडलेला दिसत आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime : राज्याच्या सीमेवर कुख्यात वनतस्कर नवसू लोहार ऊर्फ पुष्पा याला जून महिन्यात जेरबंद करण्यात आले होते. मात्र तीन महिने उलटूनही या प्रकरणातील खैर तस्करीचा मुख्य सूत्रधार तथाकथित शेठ अजूनही वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकरणाचा तपास रखडलेला दिसत आहे. (Main suspect in Khair smuggling not caught)

२१ जून रोजी वन खात्याने महाराष्ट्र-गुजरातच्या मध्यवर्ती सीमेवर कुख्यात वनतस्कर नवसू लोहार याला मोठ्या शिताफीने पकडले होते. त्याला २८ जूनपर्यंत वन कोठडी न्यायालयाने दिली होती. त्यानंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली होती. एक महिना अधिक कालावधी नवसू लोहार हा कारागृहात होता.

त्यानंतर तो जामीनावर मुक्त झाला. वन तस्करीच्या आरोपात एक महिन्याहून अधिक काळ कारागृहात असण्याची ही पहिलीच वेळ होती. तपासादरम्यान या घटनेचे गुजरात कनेक्शन आढळले. वन कोठडी दरम्यान त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये २५ संशयितांची नावे सांगितली होती. त्यापैकी १५ गुजरातमधील होते. (latest crime news)

Crime News
Jalgaon Crime News : जिल्‍हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गुजरात वलसाड येथील महेंद्र शेठ असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाचे तीन पथक अनेक दिवस त्याच्या गावी तळ ठोकून होते. मात्र तो गाशा गुंडाळून पसार झाला. अद्यापही तो वनविभागाच्या हाती लागलेला नाही.

या दरम्यान वनविभागाने दोन नोटीसही बजावल्या. तीन महिन्यात वन विभागातीलही अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे मूळ तपास करणारे अधिकारी इतर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे काय होणार याबाबतचे चित्र सध्यातरी अस्पष्ट आहे.

"खैर तस्करी प्रकरणातील मुख्य संशयित अजूनही त्याच्या गावातून फरार आहे. वनविभागाने अनेकवेळा प्रयत्न करूनही तो हाती लागलेला नाही. पुन्हा त्याची शोध मोहीम सुरू करणार आहे."- धीरज परदेशी, सहाय्यक वनसंरक्षक

Crime News
Nashik Crime News : व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अत्याचार; संशयितावर ॲट्रोसिटीअन्वये गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.