Nashik Crime News : ओझर येथे फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन लाख चौतीस हजाराला लुटले

Crime News : काळी कॅप घातलेल्या ईसमाने पंकज यांची मान पकडून, 'बहुत हप्ते हप्ते करता है,' असे म्हणत सॅक रूपये बळजबरीने काढून घेऊन पंकज यांना त्यांच्या मोटरसायकलवर ढकलून देत नाशिकच्या दिशेने पोबारा केला.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : ओझर टाउनशिप येथील उड्डाणपुला लगत एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची गाडी थांबवून तिघांनी त्याच्या ताब्यातील दोन लाख चौतीस हजाराची रोख रक्कम लुटून पोबारा केला. (Nashik Crime manager of finance company robbed of two lakh)

मंगळवार दोन जुलै रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास भारत फायनान्स ईडसलॅड बॅकेचे व्यवस्थापक पंकज कैलास खैरनार वय २४ हे भारत फायनान्स कंपनीची वसुल केलेले, दोन लाख चौतीस हजार रूपये सॅग मध्ये टाकुन सदर सॅक पाठीशी लाऊन नासिक येथुन पिंपळगाव येथे आपल्या पल्सर गाडी क्र. एम एच ४१ बी एन४३२४ जात असतांना रात्री सव्वा अकराच्या सुमारास ओझर टाउनशिप येथील उड्डाणपुलावरून जात होते.

उड्डाणपुलाच्या शंभर मीटर पुढे चार अज्ञात इसमांपैकी तीस ते पस्तीस वयाच्या दोघांनी महामार्गावरील झाडीतुन येऊन पंकज खैरनार यांची गाडी आडवली व इतर एक जण पाठीमागून स्कुटीवर येत होता. (latest marathi news)

Crime News
Nashik Fraud Crime : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेला गंडा; पंचवटीच्या हिरावाडीतील घटना

त्यांच्यापैकी काळी कॅप घातलेल्या ईसमाने पंकज यांची मान पकडून, 'बहुत हप्ते हप्ते करता है,' असे म्हणत पाठीवर असलेल्या सॅक मधील दोन लाख चौतीस हजार रूपये असलेली बॅग इतर दोघांनी बळजबरीने काढून घेऊन पंकज यांना त्यांच्या मोटरसायकलवर ढकलून देत नाशिकच्या दिशेने पोबारा केला.

यात बाबत पंकज खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३०९(६), १२७(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरूड करत आहे.

Crime News
Hanuman Nagar Crime : कुटुंब देवदर्शनासाठी गेल्याची चोरट्यांनी साधली संधी; गजबजलेल्या हनुमाननगरात फोडला बंगला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.