Nashik News : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील दिंडोरी रोडवरील गुलमोहरनगर परिसरातील वयोवृद्ध महिलेवर दिवसाढवळ्या अज्ञाताने विळ्याच्या साहाय्याने हल्ला करत खून केल्याची घटना बुधवार (ता. १०) उघडकीस आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील गुलमोहरनगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील राधानंद निवास या ठिकाणी कुसुम सुरेश एकबोटे (८०) व त्यांची मुलगी ज्योती गोविंद एकबोटे या भाड्याने राहत होत्या. बुधवारी सकाळी ज्योती एकबोटे या कामावर गेल्या.
घरात कुसुम या एकट्या असताना अज्ञात त्यांच्यावर विळ्याच्या साहाय्याने डोक्यावर व छातीवर वार करत खून करून पसार झाला. सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास कुसुम एकबोटे या घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या, असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, गुन्हे शोध पथक, पंचवटी आणि आडगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गुन्हे शाखा युनिट एकचे, गुंडाविरोधी शोध पथक कर्मचारी दाखल होत तपास करीत आहेत. (latest marathi news)
‘गुगल’च्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध"
पोलिस दलातील गुगल श्वानाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्या वेळी गुगल याने घटना घडल्या ठिकाणापासून शेजारच्या घरावर भुंकला. त्यामुळे सदर वृद्ध महिलेचा खून शेजारी राहणाऱ्याने केल्या असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. श्वान गुगलच्या मदतीने अज्ञात हल्लेखोरांचा माग काढण्यात पोलिस पथके रवाना झाली आहेत. गुगलने आतापर्यंत सहा क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत केली आहे.
"सदरच्या घडलेल्या घटनेची सर्व बाजू तपासून बघितल्या जात आहे. हल्लेखोर कोण आहे याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे. त्या अनुषंगाने संशयिताला माग काढण्यात प्राधान्य दिले आहे. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच खून का केला हे स्पष्ट होईल." - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.