Nashik Crime News : प्रियसीच्या मुलाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी! शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा प्रकार उघडकीस

Crime News : याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित प्रियकराला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.९) चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Suspect Mahesh Kumhar
Suspect Mahesh Kumharesakal
Updated on

Nashik Crime News : मराठवाड्यातून पतीपासून विभक्त होऊन तीन मुलांसह प्रियसी प्रियकरासमवेत पंचवटीत राहण्यास आली. तिच्या चार वर्षाच्या चिमुरड्याला जेवण करताना उलटी झाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या प्रियकराने त्यास फेकले असता, त्याचे डोके गॅस सिलेंडरला धडकून त्याचा मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनातून स्पष्ट झाली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित प्रियकराला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.९) चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Murderer of girlfriend son in police custody)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.