Nashik Crime News : दुचाक्या चोरीचे सत्र कायम; दीड लाखांच्या 5 गाड्या चोरीला

Nashik Crime : शहरातील उपनगरांमधून १ लाख ५५ हजारांच्या पुन्हा पाच दुचाक्या चोरीला गेल्या आहेत.
crime
crimeesakal
Updated on

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हददीतून दुचाक्या चोरीचे सत्राला आळा बसू शकलेला नाही. शहरातील उपनगरांमधून १ लाख ५५ हजारांच्या पुन्हा पाच दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. पोलिसांकडून सातत्याने नाकाबंदी करीत तपासणी सुरू असतानाही चोरटे दुचाक्या लंपास करीत आहेत. चेतनकुमार कुंभाराम चौधरी (रा. कलश अपार्टमेंट, आडगाव शिवार) यांची २० हजारांची शाईन दुचाकी (एमएच ४६ एसडी ०१५७) गेल्या २५ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. ()

तर, संदीप संपत जाधव (रा. ओढा, ता. नाशिक) यांची १५ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ आयएन १९०२) गेल्या ८ तारखेला मध्यरात्री राहत्या घरासमोरून चोरीला गेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत पांडुरंग हांडगे (रा. दिंडोरी) यांची ३० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ जीवाय ४९९९) गेल्या २ तारखेला मध्यरात्री मखमलाबाद येथील गामणे मळ्यातून चोरीला गेली.

crime
Nashik Crime News : सिन्नरमध्ये दुचाकीस्वाराने पोत ओरबाडली

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहद अफजलखा पठाण (रा. अशोक सेरेनिटी अपार्टमेंट, ध्रुवनगर, शिवाजीनगर) या युवकाची ८० हजारांची पल्सर दुचाकी (एमएच १५ जेजी ०१७२) गेल्या मंगळवारी (ता. १३) मध्यरात्री राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश जनार्दन सूर्यवंशी (रा. भद्रकाली) यांची १० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ बीसी ४०७०) गेल्या गुरुवारी (ता. १५) सायंकाळी सात वाजता चोरीला गेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Crime News : बहिणीला पळवून नेल्याने खून; इब्राहिम गांजावाला खूनप्रकरणी दोघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.