सिन्नर : शहरात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशा उपनगरांमध्ये धुमाकूळ घातलेला असून भर दिवसा चोरी करण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांनी गस्त घालून सुद्धा चोरट्यांचे चोरी करण्याचे प्रमाण वाढत आहे. दुचाकी चोरणे, बंद घराचे दरवाजे उघडणे आदी प्रकार वाढत आहे. सिन्नर सरदवाडी रोडवरील शांतीनगरमध्ये अज्ञात चोरट्यानी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी दिनांक 14 मध्यरात्रीच्या सुमारास घडली. (Nashik Crime News Burglary in Shanti Nagar in sinnar )
सुनिता रविंद्र सहाने (37) या शांतीनगर परिसरातील इरा शाळेसमोर आपल्या मुलांसोबत आई व भाऊ रोहाऊस मध्ये राहतात. त्यांच्या घराशेजारीच त्यांचे भाऊ रत्नाकर तुकाराम डावरे, अमोल डावरे यांचे घर आहे. अमोल हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर त्यांची पत्नीही माहेरी गेली असल्याने त्यांच्या घराच्या तळमजल्याला कुलूप लावून त्यांची आई, भाऊ वरच्या मजल्यावर झोपलेले होते.
तसेच सुनिता यांनीही आपल्या घराला कुलूप लावून आईसोबत झोपलेल्या होत्या. सुनिता या सकाळी झोपेतून उठून खाली आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसून आला त्यांनी घरामध्ये जाऊन बघितले असता किचनमध्ये ठेवलेले लोखंडी गोदरेज कपाट तुटलेले दिसून आले. कपाटातील सर्व कपडे व साहित्य अस्तव्यस्त पडलेले होते.
कपाटातील सुटकेसमध्ये ठेवलेल्या त्यांचे तब्बल 15 तोळ्याचे सोन्याचे दागिणे व पर्समध्ये ठेवलेले 30 हजारांची रोकडही मिळून आली नाही. त्यावर सुनीता यांनी तात्काळ आईला खाली बोलाविले. आई जिजाबाई खाली आल्या असता त्यांना सुनीता यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या अमोल यांच्याही घराचा दरवाजा उघडा दिसला आली.
जिजाबाई यांनी अमोल यांच्या घरात जाऊन बघितले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावर त्यांनी तात्काळ माजी नगरसेवक पंकज मोरे यांना फोन करून माहिती दिली. अमोल यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व फोमच्या खुर्चीचहा कप्यात ठेवलेले पैसे चोरी गेल्याने दिसून आले.
यानंतर यशवंतनगर येथील विदया दिपक गोफणे यांच्याही घरीही चोरी झाल्याचे समजून आले त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे. पंकज मोरे यांनी याबाबत पोलीसांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली. पंचनामा करून पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण केले.
या चोरीत सुनिता यांच्या घरातून 30 हजारांची रोकड, 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, 2 तोळे 1 ग्रॅम वजनीची शॉर्ट पोत, 4 तोळे 4 ग्रॅमचे मंगलसुत्र पेंडल व 1 तोळे 5 ग्रॅम वजनाची चैन, 2 तोळ्याची सोन्याची बाळी, साडेसहा तोळ्याचे सोन्याचे वेल, अडीच ग्रॅम वजनाची, 15 ग्रॅम सोन्याचा नेकलेस, 12 ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठया, 100 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पैंजनाचे दोन जोड, पायातील गोफ, हातातील कडे, कमरेची चैन, गळ्यातील सरी, एक चैन, दोन बाजुबंद चोरी झाले.
तसेच पुनम अमोल डावरे यांची 25 ग्रॅमची पट्टीपोत, कालातील सोन्याचे टॉस, 15 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठया, 18 ग्रॅम वजनाची पोत व 40 हजारांची रोकड व दिव्या गोफणे यांचे सुमारे 6 ग्रॅमच्या तीन अंगठया व 4 ग्रॅमचे ओमपान, 2 ग्रॅमचे कानातील टॉप्स चोरट्यांनी चोरून नेले.
महागाचे दाग दागिने सोने रोकड घरात ठेवू नये..
नागरिकांनी घराबाहेर सीसीटीव्ही लावावे .अनोळखी इसम दिसल्यास लगेच पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्यात येईल. कोणतेही दागदागिने रोकड घरामध्ये न ठेवता बँकेमध्ये किंवा बंदिस्त अशा सेफ्टी कपाटात ठेवावे. असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.