Nashik Crime News : नांदूर शिंगोटे गावात सशस्त्र दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

Robbed House
Robbed Houseesakal
Updated on

नांदूर- शिंगोटे (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावात रविवारी (ता. 23) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमार 5 ते 6 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. ऐन दिवाळीत या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांपुढे या दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान उभे राहीले आहे. (Nashik Crime News robbery in Nandur Shingote village)

दरोड्याचा घटनाक्रम असा...

नाशिक पुणे मार्गावर राहत असलेल्या सुभाष कराड हे नुकतेच रविवारी सायंकाळी मुंबई येथून गावी आलेले होते. दरोडेखोरांनी रात्री 12:30 वाजे दरम्यान त्यांच्या बंगल्याच्या बाजूला प्रवेश केला. हा सर्व प्रकार शेजारी असलेल्या मेंढपाळ यांनी पाहिला मात्र त्यांना वाटले मुंबई येथून पाहुणे आले आहे. त्यामुळे घरचे माणसे असतील मात्र सदरच्या दरोडेखोरांनी कराड यांचा सेफ्टी डोअर लावलेला होता व खिडकीची काच बाजूला करून आतमध्ये डोकावून बघितले असता कराड यांचा मुलगा सुभाष कराड व सायली सुभाष कराड हे अभ्यास करत असताना दिसले. हे पाहून दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला.

Robbed House
Nashik Crime News : ट्रायलच्या नावाखाली Activa केली लंपास

हा प्रकार कराड यांच्या लक्षात येताच त्यांनी आसपासच्या लोकांना जागे केले. त्यानंतर दरोडेखोरांनी थोड्याच अंतरावर असणाऱ्या राजेंद्र मारुती शेळके यांच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये सर्व थरार कैद झाला असून या ठिकाणी त्यांना सेफ्टी डोअर असल्यामुळे त्यांच्या हाती काही लागले नाही. घराबाहेर झोपलेल्या बबन शेळके नामक व्यक्तीच्या वडिलांचा उशाला ठेवलेला मोबाईल व बॅटरी घेऊन दरोडेखोरांनी तेथून पोबारा करत आपला मोर्चा जवळच असणाऱ्या संतोष गंगाधर कांगणे यांच्या घराकडे वळवला. दरवाजांच्या कड्या तोडून आत प्रवेश करत सामानाची उलथापालथ केली. संतोष कांगणे यांच्या आई रतनबाई यांना शांत बसा अंगावर असलेले दागिने काढून द्या असे सांगितले व त्यांच्या मानेला चाकू लावून सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गंगाधर कांगणे यांच्या रूम कडे वळविला व त्या ठिकाणी कांगणे हे झोपलेले असताना त्यांना काठीने मारझोड केली व तुमच्याकडे काही जी रक्कम असेल ती काढून द्या अशी धमकी दिली.

कांगणे यांनी त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपये रोख रक्कम व दहा तोळे दागिने काढून दिल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी इंदुबाई शेळके यांच्या कानातील सोन्याची टॉप्स,गळ्यातील दागिने काढून घेतले. त्यावेळी घरामध्ये असलेल्या रमेश शेळके यांच्या पत्नी अर्चना शेळके, आई, मुले हे सर्व हा प्रकार बघत होते. सर्व दागिने ओढून घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी रमेश शेळके यांच्या पायाला वीट फेकून मारली शेळके. या घटनेत शेळके यांची रोख रक्कम व दागिने मिळून साधारणतः अंदाजे पाच ते दहा लाख रुपये इतका ऐवज गेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Robbed House
Nashik Crime Update : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार; गुन्हा दाखल

हा प्रकार नांदूर शिंगोटे गावात कळताच नांदूर शिंगोटे गावचे अनेक लोक व पोलिस या ठिकाणी पोचले मात्र तोपर्यंत चोरटे या ठिकाणाहून पसार झाले होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक निफाड, सोमवार तांबे सिन्नर येथील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सिन्नर एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व वावी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर कोते व सहकारी कारवाई करून दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. या ठिकाणी डॉग स्पॉट व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.