Nashik Crime : मालेगावात NIA-ATSची छापेमारी! तिघे ताब्यात; जैश- ए- मोहम्मदला फंडिंग केल्याची शक्यता

Latest Crime News : एनआयए’ने देशभरातील पाच राज्यांतील २२ ठिकाणी छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर, महाराष्ट्रात जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही छापे टाकून कारवाई करण्यात आली.
The police presence in the area during the raid conducted by NIA in Malegaon.
The police presence in the area during the raid conducted by NIA in Malegaon.esakal
Updated on

नाशिक/मालेगाव : राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने (एनआयए) दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने मालेगावात शनिवारी (ता. ५) पहाटे छापा टाकून एका होमिओपॅथी डॉक्टरसह तिघांना ताब्यात घेतले आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेला फंडिंग केल्याच्या संशयावरून सदर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, ‘एनआयए’ने देशभरातील पाच राज्यांतील २२ ठिकाणी छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर, महाराष्ट्रात जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही छापे टाकून कारवाई करण्यात आली. दरम्यान, मालेगाव येथे छाप्यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (NIA ATS raid in Malegaon)

राजस्थानातील आठ रेल्वेस्थानके उडवून देण्याची धमकी काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. यासंदर्भात ‘एनआयए’कडून तपास सुरू असताना त्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात असल्याचे समोर आले होते. याच प्रकरणावरून देशभरात २२ ठिकाणी शनिवारी पहाटे छापे टाकून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

याच प्रकरणात काही दिवसांपासून ‘एनआयए’चे पथक मालेगावात ठाण मांडून तपास करीत असताना, शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान मालेगावातील अब्दुलानगरमधील हॉमिओपॅथी डॉक्टरसह त्याच्याकडे काम करणारे दोन जण अशा तिघांना पथकाने ताब्यात घेतले. तिघांना त्यांच्या होमिओपॅथी क्लिनिकमध्ये नेऊन सुमारे सहा त सात तास चौकशी करण्यात आली. (latest marathi news)

The police presence in the area during the raid conducted by NIA in Malegaon.
Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

क्लिनिकमधून काही संशयास्पद दस्तावेजही पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत ‘एआयए’- ‘एटीएस’ची कारवाई सुरू होती. दरम्यान, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, पोलिसांनाही याची खबर लागू दिली नाही. यापूर्वीही गेल्या वर्षी ‘एटीएस’ने मालेगावातून ‘पीएफआय’शी संबंधित असलेल्यांना अटक केली होती.

The police presence in the area during the raid conducted by NIA in Malegaon.
Hingoli Crime : व्यावसायिक अपहरणप्रकरणी सहा जणांना अटक; आरोपींना मोक्का लावणार एसपी कोकाटेंची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.