Nashik Crime: ऑफिस बॉयनेच दिली मालकाला लुटण्याची सुपारी! कोपरगावची टोळी जेरबंद; गंगापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाने लावला छडा

Latest Crime News : सहा संशयितांमध्ये एक अल्पवयीन असून, तिघे गंभीर गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार आहेत. गंगापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्याची उकल केली आहे
jailed
jailedesakal
Updated on

Nashik Crime : महात्मानगर येथे मित्रासमवेत आलेल्या सिमेंट व्यावसायिकाला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला गंगापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयित पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्याच्या तपासातून मालकाला लुटण्याची सुपारी देणाऱ्या ऑफिस बॉयलाही जेरबंद केले आहे. सहा संशयितांमध्ये एक अल्पवयीन असून, तिघे गंभीर गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार आहेत. गंगापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्याची उकल केली आहे. (office boy gave supari to rob his owner)

ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ (रा. पाईपलाईन रोड, गंगापूररोड, नाशिक), उदय राजेंद्र घाडगे (२८, रा. मोनाली अपार्टमेंट, पंचवटी इलाईट हॉटेलमागे, त्र्यंबक रोड, नाशिक. मूळ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), रोहित किशोर लोहिया, विराज कैलास कानडे, संकेत किशोर मंडलिक (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

असा आहे प्रकार....

१७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सिमेंट व्यावसायिक शारिक शेख, मित्र दीपक खताळे, संशयित ऑफिस बॉय जयेश वाघ हे शेख यांच्या कारमधून महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ आले. यावेळी शेख यांच्याजवळ दिवसभरातील दुकानातील २ लाखांची रोकड होती.

ते डाक सेवा मंडळ बिल्डींगमधील ऑफिसजवळ आले आणि शेख व दीपक खताळे हे रक्कम घेवुन ते कारमधून बाहेर आले तर, ऑफिस बॉय वाघने त्यावेळी कार पार्क करीत असल्याचा दिखावा केला. तर, दबा धरून असलेलया पाच संशयितांनी शेख, खताळे यांच्यावर चाकू, लाकडी दांडा व मिरची पावडरने हल्ला चढविला.

अचानक झालेल्या हल्ल्यातही दोघांनी संशयितांना जोरदार प्रतिकार केला. या शेख यांच्या पाठीवर चाकूने वार केले असतानाही ते रोकडची बॅग घेऊन शेजारच्या बिल्डींगमध्ये पळाले. त्यामुळे संशयितांचा लुटीचा डाव फसला आणि ते दुचाक्यांवरून पसार झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

यांनी केला तपास

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुशील जुमडे, पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, गिरीष महाले, गणेश रेहरे, सचिन काळे, मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, सोनु खाडे, भागवत थविल, शिवम साबळे यांनी सखोर तपास करीत परजिल्ह्यातून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. (latest marathi news)

jailed
Nashik Crime News : सराईत गुन्हेगारांकडे सापडला 15 किलो गांजा; अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

तांत्रिक विश्लेषणामुळे उकल

गुन्ह्या घडल्यापासून गंगापूर पोलिसांनी सखोल तपास सुरू करताना परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून संशयितांनी रेकी करून दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले. तसेच, संशयित हे नाशिकसह नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, शिर्डी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले असता, संशयित उदय घाडगे यास ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची उकल झाली.

ऑफिस बॉयने रचला कट

संशयित घाडगे याच्या चौकशीतून शेख यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या ऑफिस बॉय जयेश वाघचे नाव समोर आले. वाघनेच घाडगे सुपारी दिली. त्यानंतर घाडगे याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत महात्मानगर येथे दरोड्याचा कट रचला. विशेषत: घटनेच्या आदल्या दिवशी या संशयितांची राहण्याची सोयदेखील संशयित वाघ याने शेख यांच्याच ऑफिसमध्ये केली होती.

तर, संशयितांनी शेख, खताळे यांच्यावर हल्ला चढविला तेव्हा संशयित वाघ याने कार पार्कचा दिखावा केला. तो मदतीला धावून आला नव्हता. तसेच, पोलीस तक्रार देताना तोच फिर्यादी होण्याची उत्सुक होता. मात्र पोलीस खाक्या दाखविताच वाघ याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

jailed
Nashik Crime : उपनगरांमध्ये तीन घरफोड्यात 10 लाखांचा ऐवज चोरीला! शहरात घरफोड्यांचे सत्र; गल्ल्यातून साडेसात लाख चोरीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.