Nashik Crime News : भावकीच्या वादातून वृद्धाला पेटविले! निफाड तालुक्यातील घटना; उपचारादरम्यान मृत्यू

Nashik News : निफाड तालुक्यातील थर्डी सारोळे येथे भावकीच्या वादातून सख्ख्या भावासह कुटुंबीयांनी ८० वर्षीय वृद्धावर डिझेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली.
Nashik Crime News
Nashik Crime News esakal
Updated on

Nashik News : निफाड तालुक्यातील थर्डी सारोळे येथे भावकीच्या वादातून सख्ख्या भावासह कुटुंबीयांनी ८० वर्षीय वृद्धावर डिझेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. यात ९५ टक्के भाजलेल्या वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. (old man was set on fire Incidents in Niphad Taluka)

पोलिसांच्या माहितीनुसार, कचेश्वर महादू नागरे असे मृत वृद्धाचे नाव आहे. थडी सारोळे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून वाद असून, वयोवृद्ध कचेश्वर नागरे मंगळवारी (ता. ९) शेतातील घराजवळ होते, तर त्यांचे कुटुंबीय घरात होते.

ही संधी साधत डिझेलचे डबे घेऊन त्यांच्या धाकट्या भावासह भावजय व दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. काही समजण्याच्या आत घडलेल्या या घटनेनंतर कचेश्वर यांनी सैरावैरा पळत आग विझविण्याचा प्रयत्न केला. (latest marathi news)

Nashik Crime News
Crime: पोलिसांची मोठी कारवाई, दोन जहाल माओवाद्यांना केली अटक!

कचेश्‍वर यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीयाने घराबाहेर धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच संशयित नागरे कुटुंबीय पसार झाले होते.

या घटनेत कचेश्वर नागरे गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

Nashik Crime News
Nagpur Crime : आले चौकीदार म्हणताच पित्याने मुलावर झाडली गोळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()