Nashik Crime News : मुक्तिधाम परिसरात बनावट नोटा प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोघा तरुणींना अटक झाल्यानंतर त्यांना या नोटा देणाऱ्या नाशिक रोड येथील संशयितास अटक करण्यात आली आहे. प्रभाकर पुजारी (रा. नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित स्वाती आहिरे व पूजा कहाणे या तरुणींना मे मध्ये मुक्तिधाम परिसरातून पाचशे रुपयाच्या बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. (One arrested in case of fake currency from muktidham )
याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल असूनही तपास रखडला होता. पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या सूचनेने पथकाने दोन्ही तरुणींकडे तपास केला. तेव्हा पंचनामा व त्यांनी दिलेली माहिती व पथकाने तांत्रिक विश्लेषणानुसार संशयित पुजारी यास ताब्यात घेतले. महिलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी या बनावट नोटा देणाऱ्या पुजारीचे नाव घेतले.
पुजारी हा सामान्य व्यक्ती असून त्याने कोणाकडून बनावट नोटा आणल्या ? त्याचा मुख्य सूत्रधार कोण की त्यानेच या नोटा छापून तरुणींना दिल्या याचा तपास पोलिस करीत आहे. संशयित पुजारी याने या दोघींना बनावट नोटा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही महिलांसह संशयिताला बुधवारी (ता.२६) नाशिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.