Human Trafficking Case : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रकरणी एकाला अटक! सायबर गुन्हे, हनी ट्रॅपसाठी तरुणांचा वापर

Nashik News : मानवी तस्करीत सहभागाच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी (ता.१४) नाशिकमधून एका व्यक्तीला अटक केली आहे.
Human Trafficking Case
Human Trafficking Case esakal
Updated on

Nashik News : मानवी तस्करीत सहभागाच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी (ता.१४) नाशिकमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. सायबर गुन्हेगारी, हनी ट्रॅपसह फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याच्या समावेशाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एनआयएच्या कारवाईबाबत अधिकृतरीत्या काही कळविण्यात आले नसल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे. ( One arrested in case of international human trafficking)

एनआयएने या कारवाईबाबत अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी केले. त्यानुसार नाशिकमधील सुदर्शन दराडे या संशयिताला अटक केली असून या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे. दराडे एका संघटित तस्करी गटामध्ये थेट सहभागी होता. परदेशात रोजगार मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन भारतीय तरुणांची तस्करी केली जात असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.

गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोनसह लाओसमधील विविध ठिकाणी तरुणांना बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांच्या नियंत्रित टोळ्यांद्वारे चालविले जात असल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएच्या तपासानुसार, तस्करी केलेल्या तरुणांना क्रेडिट कार्ड फसवणूक.

बनावट ॲप्स वापरून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक आणि हनी ट्रॅप सारख्या बेकायदा ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जात होते. याच गुन्ह्यांच्या तपासादरम्यान दराडे याला नाशिकमधून अटक केली आहे. (latest marathi news)

Human Trafficking Case
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा नवा फंडा; पैसे पाठवतो म्हणत पैसेच करतात गायब

अटक केलेले सर्व आरोपी थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाममधून भारतीय तरुणांच्या लाओस सेझमध्ये अवैधरीत्या तस्करी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांवर कार्यरत तस्करांसोबत काम करत होते, असा दावा एनआयएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.

यापूर्वी पाच जण अटकेत

एनआयएसह पोलिस दलांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये संयुक्त शोध मोहिमेत २७ मे रोजी पाच जणांना अटक केली. नाशिकमध्ये शुक्रवारी (ता.१४) झालेल्या कारवाईत विविध कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, बँक खात्यांचा तपशील असलेली संशयास्पद सामग्री जप्त केली आहे.

मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारीशी संबंधित प्रकरणांचा उलगडा होण्यासाठी या सामग्रीची तपासणी एनआयएद्वारे केली जाणार आहे. मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या प्रकरणाची व्याप्ती देशभर पसरल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा थेट सहभाग आहे.

Human Trafficking Case
Nagpur Crime : एकाच आरोपीला पाच प्रकरणांत वीस-वीस वर्षे शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.