Nashik Crime News : अभोणा येथे कांदा व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा; राजस्थानचा व्यापारी असल्याचे सांगून फसवणूक

Nashik News : राजस्थानी व्यापारी असल्याचे सांगून संशयिताने परस्पर मालाची विक्री करून तीन लाख ६ हजार ५९० रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

अभोणा : येथील खासगी कांदा मार्केटमधून सचिन साहेबराव पाटील (वय ३७, व्यवसाय, कांदा व्यापार, रा. प्लॉट नं. १८, नारायण हरी बंगलो, गणेश कॉलनी, अंबड लिंक रोड, नाशिक) यांचा १३ टन ३६० किलो वजन असलेल्या एकूण २९९ कांद्याच्या गोणी राजस्थानी व्यापारी असल्याचे सांगून संशयिताने परस्पर मालाची विक्री करून तीन लाख ६ हजार ५९० रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. (Nashik Crime Onion trader extorted Rs 3 lakh in Abhona)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (ता. १३) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास संशयिताने ९५५८८ २९९११ या मोबाईल क्रमांकावरून सचिन पाटील यांना मी भुरी भाई यांचा मुलगा आहे. वडील आजारी असल्याने मीच व्यापार सांभाळतो. राजधानी ट्रेडिंग कंपनी ए-२६, जयपूर राजस्थान कंपनीचा मी मालक असून, कांदा माल जास्त दराने विक्री करून पैसे देतो, असे सांगून विश्‍वास संपादन केला.

त्यानुसार बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजता येथील खासगी मार्केटमधून ट्रकमध्ये (क्र. आरजे-०३- जीए- २७२७) माल भरून राजधानी ट्रेडिंग कंपनीच्या नावे नेला. मात्र, सदर माल संशयिताने राजधानी ट्रेडिंगऐवजी मनभर देवी लल्लुलाल शर्मा दुकान क्रमांक सी-२६७, ए-६ न्युफल सब्जी मंडी, टर्मीनल मार्केट, मुहाना, जयपुर हे दुकान देखील माझ्याच मालकीचे आहे, असे सांगून सदर मालाची विक्री केली. (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Crime News : म्हसरुळ लिंकरोडवर पोलिसांनी गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पकडला; 26 गोवंशांची सुटका

पैसे तुमच्या खात्यावर आरटीजीएस करतो, असे सांगून मोबाईल बंद केला. अद्याप फोनही बंद आहे व खात्यावरही पैसे आले नाहीत. त्यामुळे रक्कम रुपये तीन लाख ६ हजार ५९० रुपयांची फसवणूक केल्याने येथील पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ तपास करीत आहेत.

Fraud Crime
Dhule Crime News : धुळ्यात रस्तालूट करणारी टोळी गजाआड! पावणेसात लाखांची रोकड हस्तगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.