Nashik News : विमा कंपनीने प्लॉट लिलावात काढला असल्याची बतावणी करून तो विक्री करण्याच्या बहाण्याने दोघांनी महिलेकडून ८ लाख १६ हजार रुपये घेत प्लॉट व रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हा एलआयसीचा शाखा व्यवस्थापक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Ozar cheating woman for 8 lakhs)
२ जानेवारी २०२४ ते १३ जुनपर्यंत ओझर येथे राहणाऱ्या श्रीमती माने यांच्याशी संशयित उल्हास पंडीत (रा. इंदिरानगर) आणि महेंद्र जोशी (रा. गडकरी चौक) यांनी संपर्क साधत त्यांचा विश्वास संपादित करत अनिल गोविंद कुलकर्णी (रा. जानोरी रोडवर) यांचा मालकीच्या प्लॉटवर 'बाणगंगा पतसंस्था.
ओझर'चा बोजा असल्याचे माहीत असताना सुद्धा हा प्लॉट एलआयसीने लिलावात काढलेला असल्याचे सांगून सदरचा प्लॉट लिलावात विक्री करण्याच्या बहाण्याने संगनमत करून श्रीमती माने यांच्याकडून आठ लाख १६ हजार रुपये घेऊन तो प्लॉट नावावर केला नाही आणि श्रीमती. माने यांची रक्कमही परत न केली नाही. (latest marathi news)
याबाबत श्रीमती माने यांनी संशयित यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी त्यांना तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.