नाशिक : प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री आणि अंमली पदार्थांची होणारी चोरटी विक्रीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून पानटपर्यांविरोधात धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईमध्ये पोलिसांनी १६४ पानटपरी चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई मुंबई नाका, नाशिकरोड, भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील पानटपर्याचालकांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Crime Paan shop in city on radar of police marathi news)
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमलीपदार्थ व प्रतिबंधित गुटखा, पानमसला, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्या पानटपरीचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तालय हद्दीमध्ये पोलीस ठाणेनिहाय आणि विविध पथकांमार्फत शहरातील पानटपर्यांविरोधात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
एकावेळी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पोलीस ठाण्यांचे ३९पोलिस अधिकारी, गुन्हे शाखा व इतर शाखेकडील २० अधिकारी, पोलिस ठाण्यातील ५८२ पोलिस अंमलदार, गुन्हे शाखा, इतर शाखांमधील ६७ पोलिस अंमलदार असे एकूण ५९ पोलिस अधिकारी व ६४९ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
३६ हजारांचा दंड वसूल
शहर पोलिसांनी शाळा, महाविद्यालय, बसस्टॅण्ड, सार्वजनिक ठिकाणांसह कॉलनी, चौकांमध्ये असलेल्या पानटपर्याविरोधात विशेष मोहीम राबवत कारवाई केली. एकाचवेळी शहरभर राबविलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी ३६५ पानटपर्यांची तपासणी केली. यातील १६४ पानटपरी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून, ३६ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. (latest marathi news)
पोलिस ठाणेनिहाय कारवाई
पोलिस ठाणे..........तपासणी.......कारवाई........दंडाची रक्कम
- आडगाव ........२३.....००......००
- पंचवटी ..........२०......१३.....२६००
- म्हसरुळ.........३२......००.......००
- सरकारवाडा ....१६......४........८००
- भद्रकाली........२७......२७........५४००
- मुंबई नाका........७४......२०........४०००
- गंगापूर..........१९........०४.......८००
- सातपूर .........१२........१२........२४००
- अंबड........२५.......२०........४०००
- इंदिरानगर.......२४........१५.......७०००
- उपनगर.......२२.......१०.......२०००
- नाशिकरोड......४३......३२.......६४००
- देवळाली कॅम्प .....१९........३.......६००
- चुंचाळे (चौकी).....९.......४........४००
एकूण........३६५.......१६४........३६८००
''गुटखा आणि अंमलीपदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय पानटपर्यां तपासणीचे आदेश दिले होते. तसेच, कारवाई करण्यात आलेल्या पानटपर्यांवर यापुढेही सातत्याने तपासणी केली जाईल. पुन्हा निष्पन्न झाल्यास गुन्हे दाखल केले जातील.''- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.