नाशिक : पंचवटी हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लॉजमध्ये अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच, पंचवटी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी परप्रांतीय चार पीडितांची सुटका करण्यात आली असून, लॉज मालक व व्यवस्थापकाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Panchavati police raid illegal prostitution in Madhuban Lodge in panchavati )
लॉजचा मालक प्रवीण मधुकर खर्डे (रा. नाशिक), व्यवस्थापक मंटुकुमार सीताराम यादव (३२, रा. मधुबन लॉजिंग, मुंबई-आग्रा महामार्ग, पंचवटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे येथील पीडित महिलांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था फ्रिडम फर्म (पुणे)च्या प्रोग्राम असोसिएटस्ने मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लॉजमध्ये अवैधरित्या देहविक्री सुरू असल्याची खबर शहर पोलिसांन दिली होती.
त्याची गांभीर्याने दखल घेत, शहर गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी पथक तयार केले. बनावट ग्राहक सदरील लॉजमध्ये पाठविले असता, त्याठिकाणी गैरकृत्य सुरू असल्याची खातरजमा होताच पथकाने छापा टाकला.
त्यावेळी चार परप्रांतिय पीडितांकडून संशयित अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. सदरील पीडिता या पश्चिम बंगाल, झारखंड व गुजरात येथील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित व्यवस्थापक यादव यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संदीप मिटके, पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक पडोळकर, अंमलदार दीपक नाईक, निलेश भोईर, महेश नांदूर्डीकर, शहर मध्यवर्ती गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक अभिजित पवार, महिला उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, सुनील माळी, शेरखान पठार, गणेश वाघ, प्रवीण वेताळ यांच्या पथकाने बजावली.
पीडितांना धमकावले
चारही पीडिता या परराज्यातील असून, त्यांना लॉजमध्ये साफसफाई कामासाठी ठेवण्यात आले होते. परंतु संशयितांनी त्यांना बळजबरीने, धमकावून देहविक्री करण्यास भाग पाडले. तसेच, यातील एकीने पलायन करण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लॉजमध्ये मोठ्याप्रमाणात कंडोमची पाकिटे जप्त केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.