Nashik Crime News : चोरांनो, या पिंपळगावमध्ये आपले स्वागत! वाढत्या घरफोड्या पोलिसांपुढे आव्हान

Crime News : ठरावीक दिवसाच्या अंतराने होणाऱ्या घरफोडीमुळे ‘चोरांनो, या पिंपळगावमध्ये आपले स्वागत आहे’, असा फलक लावण्याचे बाकी राहिले की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
Burglary
Burglaryesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिस दलाच्या ब्रीदवाक्याच्या अमंलबजावणीत पिंपळगाव बसवंतचे पोलिस दल कमी पडत असल्याचे चित्र सध्या शहरात घडत असलेल्या घरफोडी, चोरीच्या घटनावरून सिद्ध होते. ठरावीक दिवसाच्या अंतराने होणाऱ्या घरफोडीमुळे ‘चोरांनो, या पिंपळगावमध्ये आपले स्वागत आहे’, असा फलक लावण्याचे बाकी राहिले की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Nashik Crime Pimpalgaon Increasing burglary marathi news)

मागील वर्षी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोडीचा उच्चांक नोंदविला. चिंचखेड रस्त्यावर झालेल्या घरफोडीने चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. कोटींची उलाढाल असलेली बाजारपेठ, शेतीमाल निर्यातीचे केंद्र, रोजगाराची उपलब्धता, चांदवड, दिंडोरी, निफाड, अशा तीन तालुक्यांशी थेट कनेक्टव्हीटीमुळे पिंपळगाव शहरातील नागरिकरण झपाट्याने विस्तारले आहे.

अशा पूरकस्थितीमुळे मजुरांपासून सरकारी कर्मचारी, व्यापाऱ्यांची पिंपळगाव शहरात वास्तव्याला पसंती असते. पाऊण लाखाच्या पुढे पिंपळगाव शहराची लोकसंख्या पोचली आहे. आर्थिक सुबत्तेमुळे वर्षभरापासून चोरट्यांची वाकडी नजर पिंपळगाव शहरावर पडली आहे.

मागील वर्षी २४ घरफोड्या करून लाखो रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ॲड. संजय शिंदे यांनी कन्येच्या लग्नासाठी केलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी दुपारी हातसाफ केला. यातील एकही चोरीचा शोध किंवा चोरट्यांच्या मुसक्या पिंपळगाव पोलिसांना आवळता आलेल्या नाहीत.

पिंपळगाव पोलिसांच्या खाकी वर्दीच्या मर्यादा ओळखून काही सराईत चोरट्यांनी थेट बँकेचे एटीएम फोडण्याची मजल मारली होती. तडीपार गुंड गुंग्या बिनबोभाट शहरात हिंडताना दिसत होता. याबाबत माध्यमामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कारवाई करण्याची जाग पोलिसांना आली. वैभवशाली पिंपळगावला चोरट्यांची दृष्ट लागली आहे. (latest marathi news)

Burglary
Nagpur Crime: बँक व्यवस्थापकाच्या घरात जबरदस्ती शिरला ३१ वर्षीय तरुण अन्...धंतोलीतील थरारक घटना

चोरट्यांचा बंदोबस्त कधी?

दुर्गेश तिवारी यांनी चार महिन्यांपूर्वी पिंपळगाव पोलिस निरीक्षकपदाची सूत्रे घेतली. निफाड फाट्यासह शहरातील किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न त्यांनी सोडविला. अतिक्रमणे काढताना बेशिस्त वाहतूक व अवैध वाहन पार्किंगला चाप लावण्याच्या दिखाव्यात काही पोलिस कर्मचारी वाहनचालकांकडून दंडाच्या नावाखाली स्वत:चा खिसा भरण्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत.

पोलिस निरीक्षक तिवारी यांनी अतिक्रमण काढण्यात तडफ दाखविली, तो सिंगम अवतार चोरांना बेड्या ठोकण्यात कधी दाखविणार, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांच्या कामांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरट्यांवर दहशत बसविण्यासाठी पेट्रोलिंगसह उपक्रम राबवायला हवेत.

"शहरात घरफोडींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. घर बंद करून जाणे, ही नागरिकांची चूक ठरत आहे. मागील वर्षी शहरात घरफोडीचा उच्चांक झाला. त्यातील एकाही घटनेचा छडा पोलिस लावू शकले नाहीत."-ॲड. संजय शिंदे, पिंपळगाव बसवंत

Burglary
Nashik Fraud Crime : मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगत 80 लाखांना गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.