Fake Currency : बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या!

Nashik News : प्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली तर एक जण फरार झाला.
Ambad police seized fake currency
Ambad police seized fake currencyesakal
Updated on

Nashik News : प्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली तर एक जण फरार झाला. पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार (४५, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी तो येणार आहे.

ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये ,सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, तुषार मते, प्रवीण राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला.

यावेळी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनवल्याचे सांगितले. (latest marathi news)

Ambad police seized fake currency
Crime News : अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत देहविक्री; दांपत्यासह महिलेवर गुन्हा दाखल

यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (३२,रा.सेक्टर नंबर १०, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई) यास नाशिक मधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (५२, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली,ता. सिन्नर ,जि. नाशिक ) यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली.

तर चौथा संशयित भानुदास वाघ ( रा. नांदूर शिंगोटे ) हा फरार झाला. संशयतांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या आहेत व यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का ? आदी विविध बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत.

Ambad police seized fake currency
Nagpur Crime : नशेत झालेल्या वादातून बापलेकांनी केला मित्राचा खून; वकिलासह मुलाला कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com