Nashik Crime News : म्हसरुळ लिंकरोडवर पोलिसांनी गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पकडला; 26 गोवंशांची सुटका

Crime News : चार लाखांच्या ट्रकसह गोवंशीय जनावरे असा सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक पसार झाला आहे.
cattle trafficking File photo
cattle trafficking File photoesakal
Updated on

Nashik Crime News : म्हसरुळ लिंकरोडने शहरातून परजिल्ह्याकडे जाणार्या ट्रकमध्ये दाटीवाटीने कोंबून २५ गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा ट्रक म्हसरुळ पोलिसांनी पकडला आहे. चार लाखांच्या ट्रकसह गोवंशीय जनावरे असा सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक पसार झाला आहे. (Nashik Crime Police caught cattle smuggling truck on Mhasrul Link Road)

म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या पथकाला म्हसरुळ लिंकरोडने गोवंशीय जनावरांची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार म्हसरुळ पोलिसांनी पेठरोडवरील गजानन पेट्रोल पंप आणि राहू हॉटेल परिसरात मंगळवारी (ता.२३) सापळा रचला होता.

मिळालेल्या माहितीनुसार संशयित ट्रक (जीजे १३ एएक्स १७९६) आला असता दबा धरून असलेल्या पथकाने ट्रकचालकाला ट्रक थांबविण्याचा इशारा केला. परंतु चालकाने काही अंतरावर जाऊन ट्रक थांबविला परंतु स्वत: ट्रक सोडून पसार झाला. (latest marathi news)

cattle trafficking File photo
Nashik Crime News : 9 वर्षाच्या चौकशीनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यावेळी पोलीसांनी ट्रकची पाहणी केली असता, ट्रकमध्ये अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने लहान-मोठे गोवंशीय जनावरांना कोंबण्यात आलेले होते. ट्रकमध्ये या गोवंशासाठी चारापाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. यावरून या जनावरांना कत्तलीसाठीच नेले जात असल्याची शक्यता आहे. ट्रकमध्ये तीन मोठ्या गाई, २२ लहान वासरे कोंबलेली होती.

या गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांचा गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. गोवंशीय जनावरे व ट्रक असा ८ लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार कविश्वर खराटे हे तपास करीत आहेत.

cattle trafficking File photo
Dhule Crime News : चोरट्यांची टोळी शिताफीने गजाआड! एलसीबीकडून 9 लाखांच्या 18 दुचाकी जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.