Nashik Crime News : परिक्षेत्रातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा दणका! महिनाभरात सव्वा नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.
Police Action on Crime
Police Action on Crimeesakal
Updated on

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात पोलिस पथकांकडून अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई मोहीम सुरू आहे. गेल्या महिनाभरात पाचही जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेतंर्गत पोलिसांनी तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Crime Police strike against illegal business in area marathi news)

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी नाशिक ग्रामीणसह, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकांना अवैध धंद्यांविरोधात धड कारवाई मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखांसह पोलिस ठाणेनिहाय अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रामध्ये अवैधरित्या मद्याची तस्करी मोठ्याप्रमाणात सुरू आहे. तसेच, अवैधरित्या मद्याचा साठाही केला जात असल्याचे पोलिस पथकांच्या निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे, अवैधरित्या हत्यारांची तस्करी, विक्री करताना संशयित पोलिस पथकांकडून अटक केली जात आहे. यासंदर्भात परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात पोलिसांकडून धडक कारवाई सुरू करीत गुन्हे दाखल केले जात आहेत. (latest marathi news)

Police Action on Crime
Beed Crime News : मुलाच्या घरच्यांना सांगूनही सुरू राहिली छेडछाड...; कंटाळून आठवीतील मुलीने संपवलं जीवन

सव्वा नऊ कोटींचा मुददेमाल

आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या महिन्याभरात परिक्षेत्रामध्ये अवैधरित्या मद्यसाठा, हत्यारे, जुगार अड्डे, प्रतिबंधात्मक गुटखाविरोधात कारवाई करीत, ९ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आचारसंहिता असेपर्यंत परिक्षेत्रामध्ये अशीच धडक कारवाई पोलीस पथकाकडून सुरू राहणार असून, या कारवाया अधिक तीव्र करण्याचेही आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.

गेल्यावेळीची कारवाई

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक परिक्षेत्रात पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करीत, सुमारे ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. यात रोख रकमेसह अंमली पदार्थ, गुटखा, दारू, ४४ चारचाकी वाहने, ६० दुचाकी व हत्यारे जप्त केली होती. यंदा आत्तापर्यंत अहमदनगरमध्ये ६९ लाखांची रक्कम जप्त केली आहे तर, अवैध धंदे, मद्यसाठा, हत्यारे, गुटखा असा मुद्देमाल जप्त करीत सुमारे दुप्पट मुद्देमाल जप्त केला आहे.

Police Action on Crime
Dombivali Crime : वेश्या व्यवसायातून सुटका व्हावी म्हणून अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.