Nashik News : लोकसभा निवडणुकीनिमित्त भद्रकाली पोलिसांनी पोलिस ठाणे हद्दीतील २०० हुन अधिक गुन्हेगारी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर सुमारे १० जणांना तडीपार केले आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता.२०) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत निर्विघ्न पार पडावी, यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. (Preventive action against two hundred by Bhadrakali police)
प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय सराईत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याकडूनही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. तडीपार संदर्भातील १९ प्रस्ताव पाठविले होते. त्यातील १० जणांना तडीपार केले आहे. बाकीच्यांना तडीपार करण्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे.
त्याचप्रमाणे २४० संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील, अशा काही जणांचा शोध घेऊन त्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या आहेत. अद्यापही या संदर्भातील कारवाई सुरू आहे. (latest marathi news)
कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. मतदान केंद्र तसेच परिसरात सराईतांचा वावर असणार नाही. याचेही नियोजन केले आहे. यासह आवश्यक त्या सर्व प्रकारची कारवाई आणि नियोजन केले जात आहे.
अचानक कायदा सुव्यवस्था निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात होणार आहे. त्यासाठी परराज्यातून आलेल्या पोलिस दलास परिसराची माहिती होण्यासाठी पोलिस ठाणे हद्दीत विशेषत: संवेदनशील भागातून पथसंचलन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.