Nashik Fraud Crime : निवृत्त ब्रिगेडियर महिलेचे सव्वा कोटी लांबविले; चोरलेले धनादेश वापरून घातला गंडा

Crime News : याप्रकरणी कॉलनीत राहणाऱ्या संशयित कुटूंबियांविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या ८८ वर्षीय ब्रिगेडियर महिलेच्या घरातील धनादेश चोरले आणि त्यावर त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करीत त्यांच्या बँक खात्यावरील सव्वा कोटी रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कॉलनीत राहणाऱ्या संशयित कुटूंबियांविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik crime Retired Brigadier woman extorted half crore)

दिशा टांक, किशोरभाई एन टांक, सरला टांक, देवांश टांक, विकास राजपाल रहतोगी अशी संशयितांची नावे आहेत. सेवानिवृत्त महिला ब्रिगेडियर विस्मस मेरी जेरेमीह (८८, रा. मिहिर को ऑप. सोसायटी, दत्त मंदिर रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे नाशिकरोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांमध्ये खाते आहेत.

श्रीमती विस्मस यांचा भाचा ॲन्सले हा घरी आला असता, त्यावेळी त्याने श्रीमती विस्मस यांच्याकडील धनादेश पाहिले. त्यावेळी त्यांच्या धनादेश पुस्तकातील ३८ धनादेश चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात श्रीमती विस्मस यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या बँकांमध्ये त्यांच्या बचतीच्या रकमा, म्युच्युअल फंड, एफडी असल्याचे सांगितले.

तसेच या बँकांमध्ये त्यांची दरमहा पेन्शन जमा होते व एमडीच्या माध्यमातून व्याजाची रक्कमही जमा होते, असेही त्यांनी सांगितले. संशयित दिशा हिने श्रीमती विस्मस यांच्या वृद्धापकाळाचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केली आहे. सदरील गुन्ह्याचा सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Fraud Crime: पर्यटकांना चंदीगढला सोडून ट्रॅव्हल एजंट पसार! फसवणुकीचा गुन्हा; स्वखर्चानेच केली कुल्लू मनाली ट्रीप

अशी केली फसवणूक

प्रकरण उघडकीस आल्यानंतर, बँकेकडे चौकशी व शहानिशा केली असता संशयित दिशा टांक हिने श्रीमती विस्मस यांच्याकडे येणे-जाणे असल्याने तिनेच विस्मस यांच्या बँकेच्या धनादेशाची चोरी केली. त्यानंतर त्यावर श्रीमती विस्मस यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करीत त्यांच्या बँक खात्यावरील रकमा, एफडी मोडून त्यावरील रकमा, म्युच्युअल फंडच्या रकमा असे १ कोटी २३ लाख ८५ हजार ३६७ रुपयांची रक्कम तिने तिच्या कुटूंबिय व मित्रांच्या बँक खात्यावर परस्पर वर्ग केले. विशेषत: श्रीमती विस्मस या जयराम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाही संशयित दिशा हिने त्यांच्या बँक खात्याचा वापर करीत रकमा काढल्याचे समोर आलेले आहे.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : स्क्रॅप प्रकरणी संगईंच्या कंपनीतील दोघे अटकेत; वजनकाट्यातील 3 जण ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com