Nashik Crime News: सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न रहिवाशांमुळे फसला; जुने नाशिकमधील काझीपुरा आझाद चौक येथील घटना

Nashik Crime : काझीपुरा आझाद चौक येथील एस के ज्वेलर्स सराफ दुकानात सोमवार (ता. ५) पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला.
Cut shop shutters.
Cut shop shutters.esakal
Updated on

Nashik Crime News : काझीपुरा आझाद चौक येथील एस के ज्वेलर्स सराफ दुकानात सोमवार (ता. ५) पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. परिसरातील जागरूक रहिवाशांच्या सतर्कतेने प्रयत्न फसला. त्यामुळे लाखोंचा ऐवज वाचला. दोघा रहिवाशांनी सतर्कता दाखवली नसती तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. दुकानासमोरील अन्य व्यक्तींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. (robbery attempt at bullion shop was foiled by residents in old nashik )

चारचाकी इको वाहनातून मास्क घालून आलेले सुमारे चार ते पाच चोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आझाद चौक येथील एस के ज्वेलर्स दुकानाजवळ आले. कुणाच्याही लक्षात येऊ नये. यासाठी चारचाकी दुकानासमोर उभी केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. कटरच्या साह्याने शटरची कडी आणि लोखंडी जाळीच्या पट्ट्या कापल्या. शटर आणि कटरचा आवाज झाल्याने दुकानासमोर राहणारे आरिफ मणियार, मुदस्सर शेख यांनी डोकावून पाहिले. संशयित दुकान फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले.

त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. उशिरापर्यंत येथील रहिवासी जागे असतात. नेहमी वर्दळ असते. अशा ठिकाणी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. दुकान मालक दिलीप बाविस्कर यांनी केवळ पोलिसांची भेट घेत माहिती दिली. तक्रार नसल्याने पोलिस संशयितांचा शोध घेणार की संशयित मोकाटच राहणार अशी चर्चा परिसरात सुरू होती.

Cut shop shutters.
Nashik Crime News : पंचवटीतील हनुमान वाडीत चॉपरने मारून युवकाची लुटमार; लुटमार, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

परिसरात दोन पोलिस चौक्या

घटनास्थळावरून काझीपुरा आणि बागवानपुरा अशा दोन पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर आहेत. असे असताना सराफी दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला. चोरांवर जणू पोलिसांचा वचकच राहिलेला नाही, असा आरोप या घटनेमुळे होत आहे. दोन्ही रहिवाशांनी सतर्कता दाखवली नसती तर दरोड्याची घटना घडली असती.

''घरात झोपलेले असताना शटरचा आवाज झाल्याने डोकावून पाहिले असता संशयित चोरीचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. आरडा ओरड करताच संशयित पळून गेले.''-मुदस्सर शेख, प्रत्यक्षदर्शी

Cut shop shutters.
Nashik Crime News : दुचाकीस्वाराच्या अंगावर घातली कार; कौटुंबिक वादातून घटस्फोटातील पतीला मारण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.