नाशिक : गेल्या आठवड्यात नाशिकरोड परिसरातून एमडी ड्रग्जसह अटक करण्यात आलेल्या संशयितांचेही ‘मुंबई कनेक्शन’ असल्याचे तपासातून उघड झाले आहे. तसेच, अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई गाठत दोघा संशयितांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे तर संशयित महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच संशयितांच्या ठराविक ग्राहकांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. (search for Mumbai connection of MD drug case)