Nashik Crime News : शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुखांच्या दुकानावरील छाप्यात गांजा जप्त!

Nashik News : मालेगाव रोडवरील शनिमंदिर परिसरातील दुकानावर टाकलेल्या छाप्यात रॅपर असलेल्या गांजा जप्त करण्यात आला.
Bandh placard put up to protest the action taken against Santosh Gupta.
Bandh placard put up to protest the action taken against Santosh Gupta.esakal
Updated on

Nashik News : मनमाडचे पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) पक्षाचे नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्या मालेगाव रोडवरील शनिमंदिर परिसरातील दुकानावर टाकलेल्या छाप्यात रॅपर असलेल्या गांजा जप्त करण्यात आला. गुप्ता यांना अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Nashik Crime News)

दरम्यान, राजकीय षडयंत्र रचून संतोष गुप्ता यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे (उबाठा) मंगळवारी (ता. २५) नांदगाव बंदची हाक दिली आहे. शनिमंदिर परिसरात संतोष गुप्ता यांच्या दुकानावर पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या पथकाने तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या उपस्थितीत छापा टाकला.

तेथे आठ किलो गांजा व विमल गुटख्याच्या चाळीस पुड्या जप्त करण्यात आल्या. पोलिस ठाण्याबाहेर गर्दी झाली होती. शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी गुप्ता यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांची भेट घेतली व पोलिसांनी कोणतीही शहानिशा व चौकशी न करता दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. (latest marathi news)

Bandh placard put up to protest the action taken against Santosh Gupta.
Gadchiroli Crime : अर्चना आणि गडचिरोलीच्या साथीदारांची होणार एसीबी चौकशी ? ;तक्रारीचा अर्ज महासंचालकाकडे वर्ग

योग्य ती तपासणी व चौकशी करून खोट्या गुन्ह्यातून संतोष गुप्ता यांची मुक्तता करावी, अशी मागणी केली. मात्र, ही कारवाई तहसीलदार व पंचांसमोर करण्यात आल्याचे श्री. महाजन यांनी श्री. धात्रक यांना सांगितले.

दरम्यान, मंगळवारी बंदचे आवाहन करणारे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले असून, फलकही लावले आहेत.

Bandh placard put up to protest the action taken against Santosh Gupta.
Pune Crime News : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.