Nashik Crime News : ओझरला बहिणींचा विनयभंग करत मारहाण! भावांना जिवे मारण्याची धमकी

Nashik News : तीन अनोळखी तरूणांनी अश्लील भाषा वापरून विनयभंग केला तर नंतर साथीदारांना घेऊन येत मारहाण करून तरुणीच्या भावांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ओझर येथे घडली.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

ओझर : येथील एका पडीक शेतात राहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीसह तिच्या बहिणींना तीन अनोळखी तरूणांनी अश्लील भाषा वापरून विनयभंग केला तर नंतर साथीदारांना घेऊन येत मारहाण करून तरुणीच्या भावांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ओझर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. (Nashik Crime News)

अटक केलेल्या संशयितांची नावे गणेश पोपट माळी (वय २२, रा. दिवणे, ता. निफाड, गणेश विश्वनाथ गोतरणे (वय २२, रा. ओणे), किशोर भावराव पवार (वय २३, रा. दिवाळे, ता. निफाड), जीवन लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. दिवाळे, ता. निफाड) व विकास सुभाष कडाळे (वय २२, रा. रामजी नगर, ओझर) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान ही घटना मंगळवारी (ता.२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडल्याचे तरुणींच्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार २२ वर्षीय तरुणी तिची चुलत बहीण व लहान बहीण यांच्यासह शौचविधीसाठी १६ नंबर चारी पार करून झाडीमध्ये गेल्या असता त्या ठिकाणी २० ते २५ वयोगटातील तीन अनोळखी व्यक्तींनी तिघींकडे बघून अश्लील भाषा वापरून मागे आले. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Bribe Crime : महावितरणाचा अभियंता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! पिंपळगाव बसवंत येथील घटना

तिघींनी झालेला प्रकार भावांना सांगतो, असे सुनावल्याने संशयितांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आणखी ३ ते ४ साथीदारांसह हातात ऊसतोडणी कोयते, दुचाकीची चैन घेत तरुणीच्या घरात घुसून कोयत्यांनी कापून टाकण्याची धमकी दिली. तरुणी व तिची आई त्यांचा प्रतिकार करू लागले असता एकाने तरुणीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिला मारहाण केली.

पीडितांनी आरडा ओरड केल्यानंतर सर्व संशयित गाई बांधलेल्या ठिकाणहून पळताना त्यांना गाईंनी हुंदडले. यामुळे दुचाकी जागेवर सोडून ते पळून गेले. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. एल. वाघेरे हे करत आहेत.

Nashik Crime News
Nashik Crime News : तडीपार संशयिताचा राहत्या घरात झोपेत मित्रांनी केला खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.