Nashik Crime News : तडीपार गुंडाकडून महापालिकेच्या कत्तलखान्यातच गोवंशाची कत्तल!

Nashik News : भद्रकाली परिसरातील महापालिकेच्या कत्तलखान्यात गोवंशाची सर्रास कत्तल होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : भद्रकाली परिसरातील महापालिकेच्या कत्तलखान्यात गोवंशाची सर्रास कत्तल होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या कत्तलखान्यात आणि तेही नाशिक पोलिसांनी ज्याला हद्दपार केले आहे. असा संशयित हद्दपारीचा आदेश मोडून महापालिकेच्या कत्तलखान्यात गोवंशीय जनावरांच्या कत्तली करीत असल्याचे पुढे आले. (Crime Slaughter of cattle in Municipal Slaughterhouse by Tadipar Goon)

त्यामुळे नाशिक शहरात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा विषय पून्हा एकदा चर्चेत आला आहे. फुले मार्केट घास बाजार येथील महापालिकेच्या कत्तलखान्यात जनावराची कत्तल केली जात आहे. अशी माहिती शहर गुन्हे शाखा युनिट २ पथकास मिळाली. युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भद्रकाली पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर छापा मारला.

त्यावेळी संशयित रफिक जाफर कुरेशी (वय ५६,रा. भारतनगर) त्याठिकाणी गोवंशीय जनावराची कत्तल करताना आढळून आला. एक गोवंश जनावरही बांधलेले आढळले. पथकाने ६० हजार रुपयांचे गोवंशीय मांस.

२० हजारांचा जिवंत गोऱ्हा असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जनावराची सुटका करत ताब्यात घेतले. ३०० किलो गोमांस आणि जनावराच्या कत्तलीसाठी वापरलेले हत्यार असा सुमारे ८० हजार ५०० मुद्देमाल जप्त केला. (latest marath news)

Nashik Crime News
Nashik Crime News : 500 रुपयांवरून मित्राचा खून!

तडीपाराचा सहभाग

या गुन्ह्यातील गंभीर प्रकार म्हणजे पकडलेल्या संशयिताला तीन महिन्यांसाठी शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. असे असताना बेकायदेशीररीत्या शहरात वावरत होता. बुधवार (ता.१९) गोवंश जनावराची कत्तल करतानाही आढळून आला. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, बेंडकोळी, संजय सानप, वाल्मिक चव्हाण, अतुल पाटील, गांगुर्डे, साळुंके, सय्यद, जुंद्रे यांनी बजावली.

Nashik Crime News
Peshavar Crime : वरिष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानमध्ये खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.