Nashik Crime News : 2 वर्षांपासून फरार संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक; झटपट दुप्पट-तिप्पट रकमेचे आमिष

Nashik Crime : दोन वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने डांगसौंदाण्यातून (ता. बागलाण) अटक केली आहे.
Sarai criminal arrested from Dangsaundane. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Sarai criminal arrested from Dangsaundane. Along with the team of Unit One of the City Crime Branch.esakal
Updated on

Nashik Crime News : सात लाख रुपयांचे २३ लाख रुपये करून देतो, असे आमिष दाखवून ७ लाखांच्या रोकडसह दोन वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने डांगसौंदाण्यातून (ता. बागलाण) अटक केली आहे. त्याच्या घरझडतीतून खेळण्यातल्या नोटांचे १५७ बंडल आढळले आहेत. हेच बंडल दाखवून तो समोरच्या व्यक्तीला आमिष दाखवून गंडा घालायचा.( Suspect on run for 2 years arrested )

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, ११ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगरातील फिर्यादीला संशयित तेजस आणि त्याच्या साथीदारांनी ७ लाखांच्या बदल्यात २३ लाख रुपये करून देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीकडील ७ लाख रुपये घेतले आणि त्यांच्याकडील बनावट नोटांचे बंडल दाखविले. ७ लाखांची रोकड हाती पडताच संशयितांनी पोबारा केला होता.

तेव्हापासून संशयित तेजस पसार होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे निरीक्षक मधुकर कड यांना संशयित तेजसची खबर मिळाली असता, पथकाचे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ यांनी बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे गाठले. त्याठिकाणी सापळा रचून संशयित तेजस पळून जाण्याच्या तयारीत असताना, पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यास चौकशीसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Sarai criminal arrested from Dangsaundane. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Nashik Crime News : चाडेगावात एकावर ‘फायर’! युवक जखमी; गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार पसार

दुप्पट-तिपटीचे आमिष

मोहिज फिदारी सैफी (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, मार्च २०२२ मध्ये संशयितांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. संशयितापैकी काही जण हे फिर्यादी सैफी यांच्या ओळखीतील होते. संशयितांनी त्यांना ७ लाख रुपये घेऊन या, फक्त दाखवा, त्याचे २३ लाख रुपये देतो, असे आमिष संशयितांनी दाखविले.

त्याप्रमाणे सात लाख घेऊन गंगाघाटावर पोचल्यानंतर, संशयितांनी ७ लाख ताब्यात घेत पोबारा केला. याप्रकरणी संशयित रेणुका शिवदास दिवेकर (२७), शिवाजी राघू शिंदे (५४, दोघे रा. पंचवटी), तेजस ऊर्फ बंटी वाघ आणि योगेश ऊर्फ म्हसोबा क्षिरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर, दिवेकर व शिंदे यांना तेव्हाच अटक झाली होती.

Sarai criminal arrested from Dangsaundane. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Nashik Crime News : अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.