Nashik Crime News : संशयितांकडे बनावट शासकीय प्रमाणपत्रे अन्‌ परवाने; ‘युरेनिअम’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण

Nashik Crime : कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Crime
Crime esakal
Updated on

Nashik Crime : कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुख्य संशयिताने फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला केंद्र सरकारच्या ‘डीआरडीओ’चे बनावट प्रमाणपत्र व ‘एइआरबी’चा परवाना दाखविला होता. (Nashik Crime Suspects have fake government certificates and licenses)

त्यामुळे संशयितांची मोठी साखळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, मुख्य संशयिताचा शोध नाशिक पोलिसांनी सुरू केला आहे. इंदिरानगर परिसरातील लॅण्ड डेव्हलपर राहुल शांताराम सावळे यांची संशयितांच्या टोळीने तब्बल तीन कोटी ४६ लाखांना फसवणूक केली आहे. चंदनकुमार बेरा (रा. कोलकाता) हा मुख्य संशयित असून, रघुवीरकुमार ओंकार संधू (रा. पुणे), मुकेशकुमार.

कांतिकुमार, बप्पीदास, आशिष रॉय आणि अरुप घोष (सर्व रा. कोलकाता) हे त्याचे साथीदार आहेत. ‘रेडिओक्टिव्ह मटेरिअल’ मध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष संशयितांनी सावळे यांना दाखविले. त्यासाठी सावळे यांना कोलकाता येथे संशयितांनी बोलावून घेत ‘आमचे रिसर्च सेंटर आहे. (latest marathi news)

Crime
Jalgaon Crime News : जीएस निवडीवरून ज्युनिअरचा रात्रभर छळ; शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात तक्रार प्राप्त

परराष्ट्रातील कंपन्यांतही गुंतवणूक आहे’, असेही सांगितले होते. फिर्यादी सावळे हे कोलकाता विमानतळावरून चिनार पार्क येथील संशयितांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संशयित बेरा याने संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमाणपत्र, यासह परमाणू ऊर्जा नियामक बोर्डाचा (एईआरबी) परवाना दाखविला होता.

त्यामुळे सावळे यांचा संशयितांवर विश्वास बसला. मात्र, ही प्रमाणपत्रे व कागदपत्रे बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. इंदिरानगर पोलिस मुख्य संशयितांच्या मागावर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा नाशिक पोलिस प्रयत्न करीत आहेत.

Crime
Pune Crime News : अप्पर येथे चिमुरड्याला टेम्पोने चिरडले, मुलाची आई गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.