Nashik Crime News : गोमांसासह टेम्पो जप्त! चालकाला अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनची कामगिरी

Crime News : शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार तेजस मते यांना वडाळागावात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्यासाठी टेम्पोमधून नेले जाणार असल्याची खबर मिळाली होती.
Tempo and suspected driver seized with beef from Wadala village. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Tempo and suspected driver seized with beef from Wadala village. A team from Unit Two of the City Crime Branch along withesakal
Updated on

Nashik Crime News : वडाळागावात गोवंशाची कत्तल करून गोवंशीय मांस विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित चालकाला अटक करण्यात आली असून, तिघांचा पोलिस शोध घेत आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. (Nashik Crime Tempo seized with beef transporter)

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार तेजस मते यांना वडाळागावात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्यासाठी टेम्पोमधून नेले जाणार असल्याची खबर मिळाली होती. यासंदर्भात युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.५) सकाळी युनिट दोनच्या पथकाने वडाळागावातील सेंट सादिक स्कुल रोडवर सापळा रचला.

संशयित टेम्पो (एमएच ४१ एयु ४०४९) येत असताना पथकाने नाशिक स्टील ट्रेडर्सजवळ त्या रोखले. संशयित चालक अझहर सफदर खान (३१, रा. सल्ली पॉईंट, राजवाडा, वडाळागाव) यास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, त्याने टेम्पोमध्ये गोवंशीय मांस असल्याचे सांगितले. तसेच सदरचा टेम्पो हा संशयित शोएब समद कुरेशी (रा. वडाळागाव) याचा असून नाजीर व बबलू कुरेशी, अजित कादीर कुरेशी यांनी सदरील गोवंशीय मांस पिकअपमध्ये भरून विक्रीसाठी पाठविल्याचे सांगितले. (latest marathi news)

Tempo and suspected driver seized with beef from Wadala village. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Jalgaon Crime News : 27 लाखांच्या डाळींवर डल्ला; फरारी ट्रकचालकाला मध्यप्रदेशातून अटक

पोलिसांनी घटनास्थळी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यास पाचारण करीत मांसाचे नमुने ताब्यात घेत तपासणी केली. तसेच, मांसासह टेम्पो असा ६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अझहर खान यास अटक केली आहे.

सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, हवालदार संजय सानप, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, स्वप्निल जुंद्रे यांनी बजावली.

Tempo and suspected driver seized with beef from Wadala village. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Crime News: १६ लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने लंपास!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.