Nashik Crime News : ज्‍येष्ठ नागरिक आजोबांना आर्शीवाद पडला महागात! भामट्यांनी 50 हजारांची सोन्‍याची चैन लांबविली

Nashik Crime : या भामट्याने आजोबांच्‍या गळ्यातील ५० हजार रुपये मूल्‍याची सोन्‍याची चैन लांबविल्‍याचा प्रकार समोर आला आहे.
thief
thiefesakal
Updated on

Nashik Crime News : कारमधून आलेल्‍या दोघा भामट्यांनी रस्‍त्‍याने चाललेल्‍या ज्‍येष्ठ नागरिक आजोबांना बोलविले. धात्रक फाटा परिसरातील या घटनेत आशीर्वाद देण्याच्‍या बहाण्याने या भामट्याने आजोबांच्‍या गळ्यातील ५० हजार रुपये मूल्‍याची सोन्‍याची चैन लांबविल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामजोखन तपेश्‍वर गुप्ता (वय ७७, रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) यांनी म्‍हसरुळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (thief extend gold chain of 50 thousand of grandfather )

त्‍यानुसार बुधवारी (ता.२२) सकाळी सातच्‍या सुमारास धात्रक फाटा परिसरातील धनदायी पीठाच्‍या गिरणीजवळ दोघे संशयित स्विफ्ट कारने येऊन गुप्ता यांना जवळ बोलविले. त्‍यांच्‍या डोक्‍यावर हात ठेवत आशीर्वाद देण्याच्‍या बहाण्याने भामट्यांनी त्‍यांच्‍या गळ्यातील सोन्‍याची जैन बळजबरीने चोरुन नेल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. याप्रकरणी म्‍हसरुळ पोलिस पुढील तपास करत आहेत.

thief
Nashik Crime News : गोवंशीयांची कत्तल करणारी टोळी जेरबंद! गुन्हेशाखा युनिट दोनची कामगिरी

नेकलेस मंदिरातून लांबविला

गर्दीचा फायदा घेत कपालेश्‍वर मंदिरातून चोरट्यांनी परराज्‍यातील भाविक महिलेचा सोन्‍याचा नेकलेस चोरुन नेला आहे. गुरुवारी (ता.२३) दुपारी दीडच्‍या सुमारास घडलेल्‍या या प्रकाराबाबत विजया कोलीपाका (वय ३९, रा. सिरसिल्‍ला, राजन्ना, तेलंगणा) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ७० हजार रुपये किमतीचा सोन्‍याचा नेकलेस चोरट्यांनी लांबविल्‍याचे फिर्यादीत नमूद आहे.

हिरावाडीत चेनस्‍नॅचिंग

हिरावाडीतील प्रशांत दादा हिरे नगर भागातील जेम्‍स स्कूलच्या पुढील परिसरात चोरट्यांनी महिलेच्‍या गळ्यातील सोन्‍याची पोत ओरबाडून नेली. कल्‍पना निकम (वय ६२, रा.हिरावाडी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यात म्‍हटल्‍यानुसार गुरुवारी (ता.२३) रात्री आठच्‍या सुमारास दुचाकीवर आलेल्‍या चोरट्यांनी पायी चाललेल्‍या निकम यांच्‍या गळ्यातील सोन्‍याची पोत ओरबाडून नेल्‍याचे नमूद केले आहे.

thief
Nashik Crime News : गोदाघाटावरील चोऱ्यांमध्ये वाढ! तेलंगणातील पर्यटकांच्या 70 हजारांसह मोबाईल, घड्याळ लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.