Nashik Crime News : गुंगीचे औषध देऊन लूटमार करणाऱ्या चोरट्यास अटक

Nashik Crime : लूटमार करणाऱ्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत शिताफीने अटक केली.
After arresting the thief who looted by giving Gungi medicine, Police Sub-Inspector Ashok Ahire, Assistant Police Sub-Inspector Santosh Ufade Patil, Deepak Nikam etc.
After arresting the thief who looted by giving Gungi medicine, Police Sub-Inspector Ashok Ahire, Assistant Police Sub-Inspector Santosh Ufade Patil, Deepak Nikam etc.esakal
Updated on

Nashik Crime News : रेल्वे स्थानकात प्रवासी सोबत ओळख निर्माण करून त्यांना गुंगीचे औषध देऊन लूटमार करणाऱ्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत शिताफीने अटक केली. माळेगाव (ता. सिन्नर) येथील बुद्धिसागर कुशियाल बैगा (वय २०) हा तरुण सतना (राज्य. मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढण्यासाठी आला होतो. यावेळी छत्रपती संभाजी महाराज नगर येथील मेहबूब चांद शेख (वय ४८) याने त्याच्या सोबत मैत्री करीत चहा घेण्याचा आग्रह केला. ( thief who looted by giving stupor drug was arrested )

चहा घेतल्या नंतर त्याने स्वतः जवळील गुंगीचे औषध टाकून आणलेले क्रीमचे बिस्कीट खाऊ घातले व फलाट क्रमांक एकवर आणून बसवले. थोड्यावेळाने बुद्धिसागर यास गुंगी आल्यानंतर संशयित मेहबूब याने त्याच्याजवळ असलेले १५५० रुपये, पाकीट, आधारकार्ड, पॅन कार्ड व मोबाईल असा एकूण १९ हजार ५५० रुपये किंमतचा ऐवज लुटून पोबारा केला. बुद्धिसागर बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यास पोलिसांनी बिटको रुग्णालयात दाखल केले.

After arresting the thief who looted by giving Gungi medicine, Police Sub-Inspector Ashok Ahire, Assistant Police Sub-Inspector Santosh Ufade Patil, Deepak Nikam etc.
Nashik Crime News : किराणा दुकान फोडून पाऊण लाखांचे सिगारेटवर डल्ला; आयुक्तालय हद्दीत 3 घरफोड्या

त्याला शुद्ध आल्यावर त्याने अज्ञात व्यक्तीच्याविरोधात लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक हरफुलसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक आहिरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष उफाडे-पाटील, दीपक निकम, शैलेंद्र पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे दिनेश यादव, मनीष कुमार, निर्मला सूर्यवंशी आदींनी गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करीत चोरी गेलेल्या रोख रक्कम व ऐवजासह मेहबूब शेख यास अटक केली.

After arresting the thief who looted by giving Gungi medicine, Police Sub-Inspector Ashok Ahire, Assistant Police Sub-Inspector Santosh Ufade Patil, Deepak Nikam etc.
Nashik Crime News : वणीच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटले; म्हसरुळ हद्दीत अज्ञात अपहरणकर्त्यांचा कारनामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.