सिन्नर : बसस्थानक परिसरामध्ये भरदिवसा चोऱ्यांचे प्रकार होत असून महिलांचे दागिने चोरटे दिवसाढवळ्या चोरी करत आहे. याशिवाय रस्त्याने ये- जा करणाऱ्या महिला, बँकेतून पैसे काढून घेऊन जाणारे शेतकरी यांच्यावर पाळत ठेऊन लुटण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करून कायदा-सुव्यवस्था राखावी अशी मागणी भाजपतर्फे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. (Thieves increased at Sinnar Bus Station)
सिन्नर बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय फिरायला जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्याचे प्रकारही घडत आहेत. तरीही पोलिस या घटनांना अटकाव घालू शकलेले नाहीत. महिलांना भुलीचे औषध देऊन दागिने लंपास करणे, विद्यार्थ्यांचे मोबाईल, पाकिट चोरणे, बँकांतून पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांवर पाळत ठेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटणे अशा घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात ठोस कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सिन्नर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्रवाशांना चोरांपासून सावधान राहण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात यावी, बसमध्ये चढताना प्रवाशांनी गर्दी न करता रांगेतून बसमध्ये बसावे आदी मागण्यांचे निवेदन वावी व आगारप्रमुखांनाही देण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाजपचे तालुका सरचिटणीस रामदास भोर, जिल्हा सरचिटणीस मीराताई सानप, शहराध्यक्ष मुकुंद खर्जे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष प्रवीण पवार, ओमकार सानप, रवींद्र भोर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिस कक्ष नावालाच
सिन्नर बसस्थानकासाठी असलेला पोलिस मदत कक्ष नावालाच आहे. तेथे पोलिस कर्मचारी अपवादानेच आढळतो. अनेकदा चोरीच्या घटना घडल्यानंतर नागरिकांना पायपीट करीत पोलिस ठाणे गाठावे लागते. पोलिस नियमित राहिल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल. किंबहुना पोलिस नसल्यामुळेच चोरांचे फावते आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. (latest marathi news)
प्रवाशांनीही शिस्त पाळावी
बसस्थानकामध्ये आल्यावर अनेक नागरिक आपल्या हातातील बॅगा खिडकीमधून सीटवर टाकतात व खिडकीतून उड्या मारतात हे अतिशय अशोभनीय वर्तन आहे. अशा नागरिकांवर संबंधित आगार व्यवस्थापकाने कारवाई करावी किंवा अशा नागरिकांना योग्य ती शिक्षा द्यावी. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये उभे राहून जावे लागते.
अनेक सीटवर रोड रोमिओ टिंगलटवाळी करतात या बाबींनाही अटकाव घातला गेला पाहिजे. बस फलटावर आल्यानंतर नागरिकांनी एका रांगेत बसमध्ये जावे, ही शिस्त लागली तर अप्रिय घटना घडणार नाहीत असे मतही अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
कधी होणार सिन्नर बसस्थानक चोरीमुक्त
वडांगळी : सिन्नरच्या बसस्थानकमध्ये चढताना ठाणगावच्या हौसाबाई राधाकिसन काकड (७०) यांच्या हातातील अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरांनी चोरी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. अशाचा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत.
आतातर महिलांच्या हातावर भुलीचे औषध चोळत दागिने लंपास करणारी महिला चोरांची टोळीच कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. यातील काही महिला वणी, चाळीसगावकडेही चोरी करताना काही महिन्यापूर्वी वणीच्या पोलिसांना आढळल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या सर्व घटनांचा बारकाईने आढावा घेत सिन्नर बसस्थानक चोरीमुक्त करावे अशी मागणी भाजपसह नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.