Nashik Crime : मंत्री भुजबळ यांना धमकी; संशयिताला आष्टीतून अटक! शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Latest Crime News : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व धमकी देणाऱ्या संशयिताला आष्टी (जि. बीड) येथून अटक केली आहे. संशयिताला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
A suspect who posted offensive posts on social media against Minister Chhagan Bhujbal was arrested. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
A suspect who posted offensive posts on social media against Minister Chhagan Bhujbal was arrested. Along with the team of Unit One of the City Crime Branch.esakal
Updated on

Nashik Crime : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व धमकी देणाऱ्या संशयिताला आष्टी (जि. बीड) येथून अटक केली आहे. संशयिताला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Threat to Minister chhagan Bhujbal)

रवींद्र यशवंत धनक (रा. साई श्रध्दा कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. तपासाकामी त्यास अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करीत धमकीसह अश्लिल मेसेज करण्यात आले होते. याप्रकरणी अंबड पोलिसात रविवारी (ता. २९) गुन्हाही दाखल होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी यासंदर्भात तांत्रिक विश्लेषणाच्या सूचना दिल्या असता, त्यानुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, राम बर्डे, अप्पा पानवळ, सुक्राम पवार यांनी संशयिताचा शोध सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणानुसार संशयित बीड जिल्ह्यातील आष्टीत असल्याची माहिती मिळताच पथकाने आष्टी गाठून संशयित रवींद्र धनक यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्यास गुरुवारपर्यत (ता ३) एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून तपास अंबड पोलीस करीत आहेत. (latest marathi news)

A suspect who posted offensive posts on social media against Minister Chhagan Bhujbal was arrested. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Mohol News : इलेक्ट्रिक शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना

सुरक्षेत वाढ

मंत्री छगन भुजबळ यांना मराठा - ओबीसी आरक्षणाच्या मुदयावरून वारंवार लक्ष्य केले जात आहे. मंत्री भुजबळ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमक्या व अश्लिल मेसेजेस्‌ करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल असून संशयितांवर अटकेचीही कारवाई करण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी निनावी पत्रही भुजबळ फार्म हाऊसवर आले होते. या सार्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्म येथे पोलीस बंदोबस्त तैनात असून, त्यात वाढही केली जाते.

A suspect who posted offensive posts on social media against Minister Chhagan Bhujbal was arrested. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.