Nashik Crime : संदर्भ रुग्णालयाबाहेर लुटीतील संशयित तिघे ताब्यात; दोघे अल्पवयीन

Latest Crime News : अवघ्या तीन दिवसांत भद्रकाली पोलिसांनी संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लूट केलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ५३ हजारांचा ऐवज जप्त केला.
The seized rickshaw and Bhadrakali crime investigation team along with the suspect in the loot case.
The seized rickshaw and Bhadrakali crime investigation team along with the suspect in the loot case.esakal
Updated on

जुने नाशिक : संदर्भ रुग्णालयाबाहेर चहा घेण्यासाठी आलेल्या गणेश डांगळे यांची तिघा जणांकडून लूट करण्यात आली होती. रविवारी (ता.६) ही घटना घडली होती. अवघ्या तीन दिवसांत भद्रकाली पोलिसांनी संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लूट केलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ५३ हजारांचा ऐवज जप्त केला. (Three suspects arrested in robbery)

गणेश डांगळे यांच्या पत्नीस उपचारार्थ शालिमार येथील संदर्भ रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना चहा घेण्यासाठी डांगळे रुग्णालयाबाहेर आले होते. सकाळची वेळ असल्याने त्याठिकाणी कुणीही नव्हते. याची संधी साधत रविवारी (ता.६) सकाळी सहा वाजता रिक्षा (क्रमांक एमएच १५ बी २२८६) त्यांच्याजवळ येऊन थांबली.

त्यातील तिघे खाली उतरले. एकाने त्यांना पकडून ठेवले तर अन्य दोघांनी त्यांच्या खिशातील मोबाईल काढला. त्यानंतर त्याच रिक्षात बसून तिघांनीही पळ काढला. भद्रकाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणच्या मदतीने संशयितांची माहिती काढली. (latest marathi news)

The seized rickshaw and Bhadrakali crime investigation team along with the suspect in the loot case.
Nashik Crime News : फेसबुकवर अश्‍लील मजकूर; संशयिताविरोधात गुन्‍हा दाखल

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक गुन्हे श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनात गुन्हे पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, चंद्रकांत सपकाळे, हवालदार कय्यूम सय्यद, सतीश साळुंके, अविनाश जुंद्रे, शिपाई दयानंद सोनवणे, नीलेश विखे, नारायण गवळी, विशाल गायकवाड यांनी त्यांचा शोध घेऊन अस्लम लतीफ खान (वय २१, रा. फकीरवाडी) याच्यासह त्याचे दोन अल्पवयीन सहकारी यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली.

The seized rickshaw and Bhadrakali crime investigation team along with the suspect in the loot case.
Nagpur Crime News: 'तो' मारत सुटला, दोघांचा जीव घेतला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.