Nashik Crime News : दोघींचे मोबाईल नेले खेचून; स्नॅचर्सला आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Nashik Crime : महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणे असलेले सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना आता मोबाईल खेचून नेणाऱ्यांची भर पडली आहे.
Crime
Crime esakal
Updated on

Nashik Crime News : महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणे असलेले सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना आता मोबाईल खेचून नेणाऱ्यांची भर पडली आहे. गंगापूरला घरासमोरच महिलेच्या हातातील महागडा वन-प्लसचा मोबाईल तर, इंदिरानगर पुलाजवळ महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी खेचून नेल्याचे दोन प्रकार घडले आहेत. या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हानच उभे राहिले आहे. (Nashik Crime two cases where mobile phone from woman hand was dragged away by snatchers thief)

गंगापूर रोड परिसरातील सौभाग्यनगर येथे पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील ६२ हजारांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला.

आरती श्रीशैल्य देशमुख उर्फ आरती ठाकूर (रा. कश्यपी, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या योगा ट्रेनर असून शनिवारी (ता.२) रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांच्या राहत्या रोहाऊससमोर फोनवर बोलत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील वनप्लसचा मोबाईल हिसकावून पोबारा केला.

Crime
Patas Crime : वासुंदे येथे बॅंकेच्या खासगी वसुली एजंटचा खुन

याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत. दुसरी घटना इंदिरानगर पुलाजवळ घडली. आदिती सतिश शेटे (रा. पाटीलनगर, सिडको) या २० वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता.१) रात्री आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पुलाखालून पायी जात असताना.

पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने तिच्या हातातील ७ हजारांची रेडमीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी अंबड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमलदार शिरवले हे तपास करीत आहेत.

Crime
Nagpur Crime: संतापजनक! शंभर रुपयांसाठी मुलाकडून आईचा खून, भोकरबर्डी येथील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.