Nashik Crime News : दोन घटनांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ! आडगाव, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime News : शहरातील आडगाव हद्दीमध्‌ये भू-करमापकाला धक्काबुक्की केली तर, मुंबई नाका हद्दीमध्ये पोलिस कॉन्स्टेबलला तिघांनी संशयितांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nashik Crime two incidents government employees beaten abused case registered with Adgaon Mumbai Naka Police marathi news)

आडगाव शिवारातील स्वामी नारायण नगर येथे प्लॉटची शासकीय मोजणी सुरू असताना संशयिताने भू-करमापकास धक्काबुक्की करीत दमदाटी केली. याप्रकरणी संशयित योगेश सुभाष पवार (३४, रा. स्वामी नारायण नगर) याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश मधुकर सदगीर (रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सदरचा प्रकार शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेदहा वाजता घडला. संशयिताने शासकीय मोजणी रोव्हर मशिनचेही नुकसान केले.

भाभानगर रस्त्यावर आपआपसात मारामारी करीत असताना तिघा संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी एकाकडे कोयता आढळून आला होता. तिघा संशयितांना पोलिस मेडिकलसाठी घेऊन जात असताना संशयितांनी पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला.  (latest marathi news)

Crime News
Crime News: मालवणीत दुचाकी चोरीच्या संशयातून केली मारहाण; तरुणाचा मृत्यू

आवेश इम्रान अन्सारी (२७, रा. परनो अपार्टमेंट), जाकीर बसीर शहा (२२, रा.म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव), आरिफ हामीद शहा (२४, रा. गंजमाळ, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र भिकाजी नाकोडे यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Crime News: मुंबई विमातळावर 2 कोटींचे सोने जप्त; परदेशी नागरिक अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()