Nashik Crime News : मालेगावी खंडणीप्रकरणी आणखी दोघांना अटक!

Nashik News : मालेगाव येथील शेहबाज मोहम्मद हुसेन (वय ३१, रा. लेबर कॉलनी ) या साबण विक्रेत्याचे पाच लाखाच्या खंडणीसाठी चौघा गुंडांनी अपहरण केले.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

मालेगाव : येथील शेहबाज मोहम्मद हुसेन (वय ३१, रा. लेबर कॉलनी ) या साबण विक्रेत्याचे पाच लाखाच्या खंडणीसाठी चौघा गुंडांनी अपहरण केले. एका हॉटेलवर घेऊन गेल्यावर तेथे गर्दी जमताच चौघांनी पळ काढला. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात २१ मेस गुन्हा दाखल झाला होता. यातील दोघांना १४ जूनला तर अन्य दोघांना पोलिसांनी बुधवारी (ता.२६) अटक केली. (Nashik Crime Two more arrested in Malegaon extortion case)

शेहबाज मोहम्मद हुसेन याला लेबर कॉलनीमधून २० मेस जलालउद्दीन कमालउद्दीन उर्फ आरिफ कुरेशी, शेहबाज ऊर्फ कमांडो, साद अन्सारी, मुबश्‍शीर शहा उर्फ पापा टकल्या या चौघा सराईत गुन्हेगारांनी शहेबाजकडून पाच लाखाची खंडणी मागितली होती. शहेबाजने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर त्याला चौघांनी हाताने.

लाथाबुक्क्यांनी नाकावर, कमरेवर, पोटावर मारहाण करून शिवीगाळ केली. यात शेहबाज ऊर्फ कमांडोने त्याच्याजवळ असलेला गावठी कट्टा शहेबाजसमोर धरुन तू जर आम्हाला पैसे दिले नाही तर तुला मारुन टाकू असा दम दिला होता. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Crime News : गोदाघाटावरील गुन्हेगारीत वाढ; लुटमारीच्या घटनांनी भितीचे वातावरण

शहेबाजला दुचाकीवर बसवून जाफरनगर मोरीजवळ व नंतर एका हॉटेलवर नेले. मात्र तेथे लोकांची गर्दी जमल्याने चौघेजण तेथून फरार झाले. १४ जूनला यातील मुबश्‍शीर शहा ऊर्फ पापा टकल्या (२२, रा. नॅशनल पंपाच्या मागे) व साद अहमद शकील अहमद ऊर्फ सादवा (३५, रा. रविवार वार्ड) या दोघांना अटक केली होती.

त्यानंतर जलालउद्दीन कमालउद्दीन उर्फ आरिफ कुरेशी (२६, रा. गोल्डननगर, रजापुरा) मोहम्मद शेहबाज मोहम्मद युसूफ उर्फ कमांडो (रा. गोल्डननगर) या दोघांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक वाय. ए. चव्हाण तपास करीत आहेत.

Nashik Crime News
Crime News : गोळीबारप्रकरणी आरोपीस पोलिस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.