Nashik News : मध्यवर्ती कारागृहातील बंदीला फिटफॉर प्रमाणपत्र देण्यासाठी कारागृहातील दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना ३० हजारांची लाच स्वीकारताना आज रविवारी (ता.१४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (CrimeTwo prison doctors in net of bribery Arrested)
डॉ. आबिद आबू अत्तार (४०, रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२, रा. इंदिरानगर, नाशिक) अशी दोघा लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदाराचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त आहे, तसेच ज्या कैदीने १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे, अशा कैदींना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते.
परंतु अशा कैदींना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. सदरील सर्टिफिकेट देण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोघा लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सुरवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष तडजोडीअंती ३० हजार रुपयाची मागणी केली.
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने विभागाने यासंदर्भात पडताळणी केली त्यानंतर रविवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. त्यानुसार लाचखोरांनी लाचेची तीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलिस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (latest marathi news)
पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, किरण धुळे यांनी कारवाईत भाग घेतला.
कारागृहातील लाचखोरी उघड
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील लाचखोरीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. न्यायालयीन कोठडीत कारागृहात जाणारे संशयित नेहमीच ती कोठडी टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली दाखल होणे पसंत करतात, यामध्ये कारागृहातील रुग्णालयीन विभागाकडून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याची चर्चा नेहमीच होत असते, या कारवाईमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.