मालेगाव : शहरातील अल्लमा इक्बाल पुलाजवळील गतिरोधकासमोर सव्वादोन लाख रुपयांची पिशवी पळविण्याचा प्रकार घडला होता.
छावणी पोलिसांनी या प्रकरणाचा कसोशीने चौकशी व तपास करून या गुन्ह्यातील दोघा चोरट्यांना पाच दिवसात बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त केली. (Nashik Crime Two thieves arrested for looting two lakhs)
अल्लमा इक्बाल पुलापुढील वर्धमान शाळेसमोरील रस्त्यावर सौरभ गुलाब साळुंके (वय २३, रा. आदर्शनगर कॉलनी) व त्यांचा मित्र कुणाल हे दुकान बंद करून माल विक्री करून आलेली रक्कम २ लाख ३५ हजार रुपये कापडी पिशवीत घेऊन मोतीबाग नाका येथून अल्लमा पुलाकडे दुचाकीने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना कट मारुन त्यांच्याजवळील पैशांची पिशवी हिसकावून पलायन केले होते.
२९ नोव्हेंबरला रात्री सव्वादहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. सौरभ साळुंकेच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहरात व वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली.
अपर अधिक्षक अनिकेत भारती व उपअधिक्षक सोहेल शेख यांनी त्यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलिस नाईक प्रसाद देसले, कैलास चोथमल, पोलिस शिपाई संदीप राठोड, राम निसाळ, दीपक भोये आदींनी या प्रकरणी तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने माहिती काढत अरबाजखान नजीरखान (२२, रा. गुलशने इब्राहीम) व मेराज हुसेन निजामुद्दीन (२२, रा. गुलशेरनगर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
दोघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल श्री. उमाप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.