Nashik Crime News : शिवाजीनगरला टवाळखोरांचा धुडगूस; कारची काच फोडून दोघांची केली लुटमार

Nashik News : शिवाजीनगर परिसरातील फाशीचा डोंगर येथे टवाळखोर चौघांनी कारचालकासह त्याच्या मित्राला कुरापत काढून मारहाण केली.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : शिवाजीनगर परिसरातील फाशीचा डोंगर येथे टवाळखोर चौघांनी कारचालकासह त्याच्या मित्राला कुरापत काढून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील ऐवज हिसकावून घेऊन कारची काचही फोडत लुटमार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)

यश चंद्रकांत कोठावदे (रा. मूळ रा. घाटकोपर, मुंबई. सध्या रा. सरस्वती अपार्टमेंट, कुलकर्णी कॉलनी, शरणपूर रोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १५) पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास तो व त्याचा मित्र असे दोघेजण त्यांच्या टियागो कारमध्ये फाशीचा डोंगराजवळ असलेल्या क्रेव हॉटेलच्या अलिकडे थांबलेले होते.

त्यावेळी १८ ते २५ वयोगटातील चौघे संशयित त्याठिकाणी आले आणि त्यांनी ‘तू येथे का थांबला?’ असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. (latest marathi news)

Nashik Crime News
Jalgaon Crime News : गांधलीपुऱ्यात मोटरसायकल अडवून तिघांना मारहाण; 5 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

तसेच, शिवीगाळ करीत दमदाटी, मारहाण केली. तसेच, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, हातातील घड्याळ आणि रोकड असा १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला.

तसेच त्यांच्या टियागो कारची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक गेगंजे हे तपास करीत आहेत.

Nashik Crime News
Nashik Crime : रोटरमध्ये अडकून तेरा वर्षीय बालकाचा करुण अंत! चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.