Nashik Crime News : शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारांना लुटणारे दोघे गजाआड! चोरीचे मोबाईल अन 12 दुचाकी हस्तगत

Latest Crime News : गेल्या आठवड्यात पाथरे शिवारात रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणास अडवून त्यास दोघांनी मारहाण केली होती.
arrested criminals
arrested criminalsesakal
Updated on

सिन्नर : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी वावी ते पाथरे दरम्यान दुचाकीस्वारांना अडवून त्यांना मारहाण करत रोख रक्कम व मोबाईल फोन चोरणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने व वावी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले तीन मोबाईल फोन व तब्बल 12 दूचाकी हस्तगत करण्यात आल्या. (Two who robbed bikers on Shirdi highway arrested)

गेल्या आठवड्यात पाथरे शिवारात रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणास अडवून त्यास दोघांनी मारहाण केली होती. मारहाण करणारे दोघेजण पल्सर मोटरसायकल वरून आले होते व त्यांनी मंकी कॅप घालून चेहरे झाकले होते.

सदर तरुणांकडून त्यांनी त्याचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा 21 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला होता. त्याच रात्री दुसंगवाडी शिवारात देखील एका दुचाकीस्वारास दोघांनी मारहाण केली होती. मारहाणीच्या या दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य असल्याने दोन्ही ठिकाणी एकच गुन्हेगार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. 

या घटनांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलीस यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  राजु सुर्वे यांनी वरील गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व अभिलेखावरील आरोपींची माहिती घेवून गुन्हे शाखेचे सहाय्यक  निरीक्षक संदेश पवार वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक गणेश शिंदे यांना तपासकामी मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे वरील गुन्हयाचे समांतर तपासात पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्हयातील काही संशयीत गुन्हे करण्यासाठी नाशिक जिल्हयाचे सीमावर्ती भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने पाथरे फाटा शिवारात सापळा रचुन संशयीत सलीम रहीम पठाण (२९) रा. रायते, ता. येवला, हल्ली काळेमळा, शिर्डी यास शिताफिने ताब्यात घेतले. 

त्याने व त्याचा साथीदार बबलु युसूफ शेख, रा. गणेशनगर, राहाता याचेसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. सलीम पठाण याच्या जवळून जबरीने चोरून नेलेले ०३ मोबाईल फोन, गुन्हयात वापलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटर सायकल असा एकुण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. (latest crime news)

arrested criminals
Nandurbar Crime News : दरोड्यातील 6 आरोपींना कारावास! दहा हजारांचा दंड; अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचा निकाल

त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली. गुन्हे शाखेचे पथक व वावी पोलीसांनी सलीम रहीम पठाण याचेकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचे साथीदारासह कोपरगाव, राहुरी, शिर्डी, वावी परिसरात रात्रीचे सुमारास एकटया दुचाकीस्वारांना अडवून जबरी लुटमार केल्याची कबुली दिली. 

त्याचा साथीदार बबलु शेख याचा शोध घेतला असता तो येवला शहर पोलीस ठाणेकडील मोटर सायकल चोरीचे गुन्हयात अटक असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांनी मिळून नाशिक जिल्हयातील येवला शहर, येवला तालुका, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर परिसरात मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांच्या ताब्यातून चोरीच्या  १२ मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या. एकूण सात लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मोटरसायकल चोरी व जबरी चोरीचे आणखी गुन्हे त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, संदिप नागपुरे, प्रदिप बहिरम, वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण सोनवणे, हवालदार शहाजी शिंदे, सचिन काकड यांनी या संयुक्त तपास मोहिमेत सहभाग घेतला.

arrested criminals
Jalgaon Crime News : सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यास मारहाण! आमदार येऊन गेले अन्‌ कंत्राटदाराकडून मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.