Nashik Crime News : संतापजनक घटना! अडीच वर्षाच्या चिमुरडीवर चुलत काका कडुन अत्याचार

Nashik News : चारोसे, ता. दिंडोरी येथे एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर नात्याने चुलत काका असलेल्या २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime News esakal
Updated on

वणी : चारोसे, ता. दिंडोरी येथे एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर नात्याने चुलत काका असलेल्या २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत संशयीत आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी पोलीस ठाणे हद्दीत चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी ता. १३ जुन रोजी सायंकाळी ०५:३० वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना मुलीचा नात्याने चुलत काका असलेला संशयीत आरोपी रतन भास्कर गांगुर्डे, वय २१ वर्ष, राहणार चारोसे तालुका दिंडोरी याने तिला घरासमोरून घेऊन गेला.

मुलगी बराच वेळ झाले दिसत नाही म्हणून तिचे घरातील व आजू बाजूचे लोकांनी तिचा शोध घेत असताना रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयीत मुलासह दिसून आली. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Crime: नाव बदलून शहरात वावरणाऱ्या सराईताला शिताफीने अटक; दीड वर्षांपूर्वीच्या प्राणघातक हल्ल्यापासून होता फरार

संशयीताने अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि जबाब नोंद करून गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पोस्को कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि. सुनिल पाटील करीत आहे.

Nashik Crime News
Nashik Crime: वसतीगृहाचे साहित्य अन्‌ जेवणाची खोटी बिल दाखवून 19 लाखांचा अपहार! सातपूर ITIच्या प्राचार्याचा प्रताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.