Nashik Crime News : वैभव लहामगेच्या पोलिस कोठडीत वाढ

Nashik News : कुस्तीपटू भूषण लहामगे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव यशवंत लहामगे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.२१) वाढ करण्यात आली आहे.
Crime
Crime esakal
Updated on

Nashik News : कुस्तीपटू भूषण लहामगे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव यशवंत लहामगे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.२१) वाढ करण्यात आली आहे. तर वैभवच्या आई- वडिलांची न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे. नाशिक- मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे कुस्तीपटू भूषण लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांची १० मे रोजी वैभव यांच्यासह साथीदारांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली होती. (Vaibhav Lahamge Increase in police custody)

या प्रकरणी संशयित यशवंत लहामगे, वैभव लहामगे, सुमनबाई लहामगे यांनी कट रचून भुषणची हत्या केल्याचा गुन्हा वाडीवर्हे पोलिसात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरुवारी (ता.१६) न्यायालयात हजर केले असता वैभवच्या पोलिस कोठडीत वाढ तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (latest marathi news)

Crime
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

या हत्येत वैभवसोबत सतीश चौधरी व रतन जाधव (दोघे रा. सिडको) या दोघा संशयितांचाही सहभाग समोर आला आहे.

या दोघांनीच जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत घरफोडी करून सुमारे ५ कोटी रुपयांचे दागिने चोरल्याचे उघड झाले आहे. दोघे संशयित फरार असून शहर व ग्रामीण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime
Nashik Lok Sabha Election : परराज्यातील ‘होमगार्ड’ बंदोबस्तासाठी येणार! सेक्टर अधिकाऱ्यांकडून ‘बुथ’वर नजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()