Nashik Crime: वेटरला मारहाण करून सोन्याची चैन, मोबाईलसह 57 हजारांचा ऐवज लांबवला; जेवण अन मद्याचे बिल मागितल्याचा राग

Crime News : यावेळी झालेल्या झटापटीत हॉटेलचा चालक व वेटरच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, मोबाईल फोन असा 57 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन मारहाण करणारे पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
crime news
crime newsesakal
Updated on

वावी : सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात नाशिक पुणे महामार्ग लगत असलेल्या हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान केल्यानंतर बिल मागितल्याचा राग आल्याने वेटरला मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यावेळी झालेल्या झटापटीत हॉटेलचा चालक व वेटरच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, मोबाईल फोन असा 57 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन मारहाण करणारे पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Waiter beaten looted with gold chain mobile phone)

नांदूर शिंगोटे शिवारात पुणे रस्त्यालगत मानस साहेबा हॉटेल रवींद्र वेलजाळी यांनी चालवायला घेतले आहे. गुरुवारी रात्री शुभम कुटे, रा. मऱ्हळ, वैभव खडके, रा. नांदुरशिंगोटे, भैय्या खाडे, रा.खंबाळे, कृष्णा थोरात, रा. पंचाळे, कृष्णा घोटेकर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांचे सह इतर आणखी तिघेजण हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते.

जेवणापूर्वी त्यांनी मद्यपान केले. त्यांचे जेवण व मद्याचे बिल मागण्यासाठी हॉटेलचा वेटर हसन अत्तार हा गेला असता. वरील व्यक्तींनी त्यास बिल मागितल्याच्या कारणावरून बियर व विस्की च्या बाटल्या, लोखंडी गज, हॉटेलमधील खुर्च्या उचलून मारहाण केली. यावेळी हॉटेलचा चालक रवींद्र वेलजाळी हा त्याला सोडवण्यासाठी पुढे गेला असता कोणी पुढे आल्यास व आमच्याकडे जेवणाचे बिल मागितल्यास आम्ही कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. (latest marathi news)

crime news
Pandharpur Crime: नागरिकाच्या सतर्कतेमुळे वाचली लाखोची रक्कम, चोराचा प्रयत्न फसला!

यावेळी झालेल्या झटापटीत रवींद्र वेलजाळी यांच्या खिशातील 15 हजार रुपये रोख रक्कम, वेटरच्या गळ्यातील पंधरा हजार रुपयांची सोन्याची चेन, तेरा हजार रुपये रक्कम, मोबाईल फोन असा मिळून 57 हजार रुपयांचा मुद्देमाल गहाळ झाला. हा मुद्देमाल मारहाण करणाऱ्या टोळक्याने चोरून नेल्याचे वेलजाळी यांनी वावी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

crime news
Nagpur Cyber Crime : कधी शेअर तर कधी टास्कचे आमिष; दररोज वीस जणांची सायबर फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.