Nashik Crime News : कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.१८) रात्री चव्हाटा भागात घटना घडली. भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या रूट मार्चनंतर लगेचच त्याठिकाणी घटना घडल्याने संशयितांनी जणू पोलिसांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. संशयित ओम सासे आणि विकी शिंदे यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून धनंजय महेश गायकवाड (ता.२३, रा, काजीपुरा कोट) यास घरी जाऊन शिवीगाळ केली. (Nashik Crime weapons attack on two person marathi news)
धनंजय याने त्यांना घराच्या बाहेर जाऊन बोलू, असे म्हणत चव्हाटा परिसरात आणले. त्या ठिकाणीही संशयितांनी वाद घालत शिवीगाळ केली. दरम्यान सासे याने त्याच्याकडील कोयता काढून धनंजयवर हल्ला केला. तो जखमी झाल्याने त्या सोडवण्यासाठी त्याचा मित्र अजय राऊत गेला. संशयितांनी त्यावरही हल्ला चढवत जखमी केले. दोघे जण आरडाओरड करत पळू लागले. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. (latest marathi news)
गर्दी झाल्याचे बघताच संशयितांनी पळ काढला. नागरिकांनी त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करत माहिती घेतली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटना घडण्याच्या अवघ्या दोन तासांपूर्वी पोलिसांनी केंद्रीय पथकासह शीघ्र कृती दल, जलद प्रतिसाद दल यांच्यासह भद्रकाली पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुने नाशिकसह घटना स्थळावरून संचलन करून संशयित तसेच टवाळखोरांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र संशयितांनीच या घटनेच्या माध्यमातून पोलिसांना आव्हान देण्याचे काम केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. आगामी सण उत्सव आणि निवडणुका लक्षात घेता अशा प्रकारची परिस्थिती घातक असल्याच्याही प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.