Nashik Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध अन पती गेला जीवानिशी; दोघांच्या बेदम मारहाणीत अमोलचा मृत्यु

Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने अमोल काठे याने रविशंकर मार्ग परिसरात राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकराचे घर गाठले अन...
Murder News
Murder Newsesakal
Updated on

नाशिक : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने अमोल काठे याने रविशंकर मार्ग परिसरात राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकराचे घर गाठले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता, पत्नीचा प्रियकर व त्याचा भाऊ या दोघांनी अमोल यांच्या डोक्यात हेल्मेटने प्रहार केले, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळेच अमोलचा याचा जीव गमवावा लागला. बेदम मारहाणीमुळे जागीच मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालातूनही स्पष्ट झाले आहे.

तर, मयत अमोल याने त्याच्याकडील पिस्तुलातून पत्नीच्या प्रियकरावर एक गोळी झाडली मात्र सुदैवाने त्यात तो बचावला. मात्र अमोलने त्याच्याकडील चॉपरने केलेल्या हल्ल्यात दोघे संशयित जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Wife external relationship husband died ravishankar marg shooting case marathi news)

कुंदन अरविंद घडे, चेतन अरविंद घडे (रा. महादेव पार्क सोसायटी, कल्पतरुनगर, रविशंकर मार्ग) असे दोघा संशयितांची नावे आहेत. तर अमोल पोपटराव काटे (३८, रा. साकराबाई निवास, एकलहरे रोड, नाशिकरोड) असे मयत व्यक्तीचे नाव असून, तो माजी सैनिक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल यांच्या पत्नीचे सामनगाव रोड येथे ब्युटीपार्लर आहे. काही महिन्यांपूर्वी कुंदन घडे याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती अमोलला मिळाली होती. त्यावरून गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमोल याने विषप्राशन करून आत्महत्त्येचाही प्रयत्न केला होता. तसेच, न्यायालयात फारकतीचा दावाही दाखल करण्यात आलेला होता.

दरम्यान, अमोल याने पत्नीचा प्रियकर कुंदन याची ‘हिस्ट्री’ काढून त्याला जाब विचारण्यासाठी रविवारी (ता.१०) रात्री दहाच्या सुमारास रविशंकर मार्गावरील महादेव पार्क सोसायटीत आला. येताना अमोल याने स्वत:चे पिस्तुल आणि चॉपरही घेऊन आला होता. अमोल यांनी कुंदनला जाब विचारला असता त्यांच्यात वादविवाद सुरू झाला.

त्यावेळी त्यांच्यात झटापटीही सुरू झाल्या असता, अमोल याने त्याच्यकडील पिस्तूल काढत कुंदनच्या दिशेने एक गोळी झाडली. मात्र, सुदैवाने ती गोळी कुंदनला लागली नाही. तर गोळीच्या आवाजाने सोसायटीतील रहिवाशी पार्किंगमध्ये धावले. त्यावेळी कुंदनचा भाऊ चेतन घडेही मदतीला धावून आला.

दोघांनी अमोल यांना त्यांच्याच हेल्मेटने डोक्यावर बेदम मारले. त्यावेळी अमोल यानेही त्याच्याकडील चॉपर दोघा घडे बंधूंवर वार केले. यात अमोलकडील पिस्तुलही खाली पडले. दोघा भावांनी अमोल यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात वर्मी घाव बसल्याने काही मिनिटातच अमोल सोसायटीच्या पार्किंगमध्ये निपचित पडला.

घटना समजताच उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी घडे बंधुंविरोधात खुनाचा गुन्हा उपनगर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. तर, मयत अमोल काठे याच्याविरोधातही प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Murder News
Crime News: आंबे चोरण्याचा संशयातून महिलेवर गोळी झाडत केला हल्ला

पोलीस तपासात

- हेल्मेटच्या मारहाणीत अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापती

- हेल्मेटच्या ठिकऱ्या उडालेल्या होत्या

- पार्किंगमधून पिस्तुल व रिकामी पुंगळी, चॉपर जप्त

- संशयित दोघांवर चॉपरचे वार

- मयत अमोलचा यापूर्वीही आत्महत्त्येचा प्रयत्न

- अमोलच्या मृत्युस पत्नीचे अनैतिक संबंध कारणीभूत

अमोल माजी सैनिक

अमोल काठे हा माजी सैनिक असून, पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळेच त्याने लष्करातील नोकरीला राजीनामा दिल्याचे बोलले जाते. तो आरोग्य विद्यापीठात सुरक्षारक्षकाचेही काम करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एटीएमच्या कॅश व्हॅनवर गार्ड म्हणून काम करीत होता. पत्नीचे पुन्हा विवाहबाह्य संबंधामुळे त्याने नोव्हेंबर महिन्यात आत्महत्त्येचाही प्रयत्न केला होता. तर काही महिन्यापासून त्याची पत्नी माहेरीच राहत होती, अस पोलीस तपासातून समोर आले आहे.

शवविच्छेदनाचा अहवाल

अमोल काठे यांच्या मृतदेहाचे सोमवारी (ता. ११) जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असता, यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. तसेच, अंतर्गत रक्तस्त्रावही मोठ्याप्रमाणात झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्यांच्या शरीरावर कुठेही गोळी लागल्याचा निशान आढळून आलेले नाही. डॉ श्रावण गायकवाड यांनी शवविच्छेदन केले आहे.

Murder News
Nashik Crime News : ‘ॲमेझॉन’च्या कॅशवर सुरक्षारक्षकाचाच डल्ला; संशयित रोकड घेऊन पसार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.